
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण सुधारित कार्यक्रम जाहीरसांगली जिल्ह्यात 93.98 टक्के मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- बीएलओमार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 17 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार- नागरिकांना मतदार यादीतील माहिती अचूक राहण्यासाठी बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन
सांगली, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमात सुधारणा केली असून, त्यानुसार राज्यातील सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदार यादीतील माहिती अचूक राहण्यासाठी बीएलओंना आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देत या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे
सांगली जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून 25 लाख 73 हजार 339 मतदारांपैकी 25 लाख 48 हजार 157 मतदारांना ईएफएस (Enumeration Form) वितरित करण्यात आले असून हे प्रमाण 99.02 टक्के आहे. यापैकी 24 लाख 18 हजार 424 मतदारांचे प्रत्यक्ष डिजिटायझेशन पूर्ण झाले असून त्याचे प्रमाण 93.98 टक्के इतके आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार बीएलओमार्फत घरभेटी 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत सुरू राहणार आहेत. त्यानंतर 17 ऑगस्ट 2026 रोजी मतदार केंद्रांचे सुसुत्रीकरण / पुनर्रचना, 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप यादीवर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 असा राहील. नोटीस टप्पा / दावे व हरकती निकालात काढणे 24 ऑगस्ट 2026 ते 22 ऑक्टोबर 2026. अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे
सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार संख्या व विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत डिजिटायझेशन पूर्ण झालेल्या मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे – 281-मिरज (अ.जा.) मतदारसंघात 3 लाख 49 हजार 527 मतदारांपैकी 3 लाख 11 हजार 553 (89.14 टक्के), 282-सांगली मतदारसंघात 3 लाख 65 हजार 272 मतदारांपैकी 3 लाख 11 हजार 529 (85.29 टक्के), 283-ईश्वरपूर मतदारसंघात 2 लाख 84 हजार 367 मतदारांपैकी 2 लाख 73 हजार 68 (96.03 टक्के), 284-शिराळा मतदारसंघात 3 लाख 8 हजार 602 मतदारांपैकी 3 लाख 3 हजार 54 (98.20 टक्के), 285-पलूस-कडेगाव मतदारसंघात 2 लाख 92 हजार 126 मतदारांपैकी 2 लाख 82 हजार 207 (96.60 टक्के), 286-खानापूर मतदारसंघात 3 लाख 57 हजार 200 मतदारांपैकी 3 लाख 35 हजार 582 (93.95 टक्के), 287-तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात 3 लाख 18 हजार 621 मतदारांपैकी 3 लाख 11 हजार 678 (97.82 टक्के) आणि 288-जत मतदारसंघात 2 लाख 97 हजार 624 मतदारांपैकी 2 लाख 89 हजार 753 (97.36 टक्के) मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण 25 लाख 73 हजार 339 मतदारांपैकी 24 लाख 18 हजार 424 मतदारांचे (93.98 टक्के) डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे
जिल्हा प्रशासनाने उर्वरित कामही निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, बीएलओ आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
00000



