vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गणेशोत्सवात घुमतेय ‘आरती समतेची’; हेदली गावाचा अनोखा सामाजिक प्रबोधनाचा उपक्रम

गणेशोत्सवात घुमतेय ‘आरती समतेची’; हेदली गावाचा अनोखा सामाजिक प्रबोधनाचा उपक्रम

 

खेड, प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील हेदली गाव हे पुरोगामी विचारांची परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. गणेशोत्सवात गावात ‘आरती समतेची’ या अनोख्या उपक्रमातून समता, बंधुता, मानवतावाद, पर्यावरण रक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश दिला जात आहे.

गणेशोत्सवातील पारंपरिक आरतीला सामाजिक प्रबोधनाची जोड देत या आरतीच्या माध्यमातून समाजात समता व बंधुता नांदावी, जात-पात विसरून एकोप्याने राहावे आणि देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असा संदेश देण्यात आला आहे.

 पर्यावरणाचे संरक्षण, समाजाप्रती बांधिलकी आणि प्रत्येक नागरिकाने मानवतावादी व शोधक बुद्धीचा स्वीकार करावा, यावरही आरतीतून विशेष भर देण्यात आला आहे.

 गणेशोत्सवातील सामाजिक प्रबोधनाचे ती एक प्रमुख आकर्षण ठरत आहे. संस्कृती व परंपरा जपत त्यातून पर्यावरण रक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समानतेची मूल्ये रुजविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

‘आरती समतेची’ ही ‘येई वो विठ्ठले माझे माऊली ये’ या चालीवर आधारित असून, विविधतेने नटलेल्या भारतात एकजुटीने राहण्याचा संदेश ती देते. संत-महात्म्यांनी दिलेला मानवतेचा विचार, महापुरुषांची चरित्रे वाचून विचारांची जडणघडण, समतेचा आणि शांततेचा झेंडा उंचावणे, विद्यार्जनातून विवेकबुद्धी विकसित करणे तसेच जन्मापेक्षा विचार, आचार आणि कर्तृत्वाला महत्त्व देणे, असे विविध सामाजिक संदेश या आरतीतून मांडण्यात आले आहेत.

गणेशोत्सवात मनोरंजनासोबतच कोकणची पारंपरिक लोककला असलेल्या जाखडी नृत्याच्या माध्यमातूनही समाजप्रबोधन केले जात आहे. शाहिर सचिन गोवळकर व सदानंद शिगवण, ढोलकी पटू रुपेश चिनकटे, मधुकर मेंगडे हे जाखडीच्या माध्यमातून समाजप्रबोधनपर गीते सादर करून महापुरुषांचे विचार जनमानसात रुजविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे उत्सव हा केवळ धार्मिक किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता विचार, विवेक आणि सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरत असल्याचे चित्र हेदली गावात पाहायला मिळत आहे.

**आरती समतेची

(चाल :येई वो विठ्ठले माझे माऊली ये )

यारे या जन सारे,आरती समतेची गाऊशिकवण बंधूत्वाची SS आपुल्या मनोमनी रुजवू || धृ ||

देश आमुचा विविधतेने जगात हा नटला नाना रंगी फुले उमलली बाग जणू फुलला देश उन्नतीसाठी SS सारे एकजूट होऊ || 1 ||

संत महात्मे या धरतीवर जन्माला आले

मानवतेचा मंत्र देऊनी अमरपदी गेले

विसरुन जाती पाती SS बंधूभावाने राहू || 2 |

थोराची वाचूनी चरित्रे मन आपुले घडतेअतुट नाते समाज जिवनासवे इथे जडते,समतेचा शांतीचा SS झेंडा चहुकडे मिरवू || 3 |

विकसित होई विवेकबुध्दी विद्यार्जन करीता ज्ञानासंगे कर्तत्वाचे पाऊल ही पडता धडा सहजिवनाचा विद्यामंदिरत गिरवू || 4 |

उच्च कुळी जन्माला म्हणून का थोर कुणी ठरतो,विचार करणी आचारणाने जगी अमर होतो

समाजसेवेसाठी सारे सज्ज आता होऊ || 5 ||

अधिक माहितीसाठी – 9653391877

 

संबंधित पोस्ट

दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेलवर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन,पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते श्री .नरेश म्हस्के यांच्याशी पर्यावरण प्रेमींचा थेट संवाद**

सर्वांसाठी घरे हे ध्येय साकारण्यासाठी प्रत्येक मंडळात क्लस्टर विकसित करु – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जन्मदिनी रक्तदानातून मानवंदना घनसावंगी विधानसभेत शेकडो कार्यकर्त्यांचे रक्तदान…..    

vishwatmaklokswamivarta