vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अलिबाग येथील उदया बाजारला पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांची सदिच्छा भेट 

अलिबाग येथील उदया बाजारला पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

रायगड-अलिबाग प्रतिनिधी : टाटा कम्युनिकेशन्सच्या सीएसआर अंतर्गत २०१९ पासून रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्प उदया अंतर्गत महिला व दिव्यांग व्यक्तीकरिता उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन भारतीय उद्योजकता विकास संस्था (इडीआय) यांचे द्वारा केले जाते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या महिला उद्योजिकांच्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या हेतूने उदया महिला उद्योजिका असोसिएशनच्या माध्यमातून उदया बाजार आउटलेट स्टोअर्सचा शुभारंभ अलिबाग येथे करण्यात आला. या स्टोअर्सला राज्याचे रोजगार हमी ,फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना .भरतशेठ गोगावले यांनी सदिच्छा भेट देवून उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक ऑचल दलाल ,जिल्हा उद्योग केंद्राचे उप आयुक्त जी. एस. हरळय्या, जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत कळंबे तसेच महिला असोसिएशन च्या पल्लवी जोशी,रजनी पाठक,अश्विनी सकपाळ, इडीआय प्रशिक्षक जॅकी सर,उद्योजक मयूर ठक्कर उपस्थित होते सर्व मान्यवरांचे स्वागत इ डी आय प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी केले.

000000

संबंधित पोस्ट

राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विशेष बाल पोलीस पथक’ अनिवार्य,बालहक्क संरक्षण आयोगाच्या वैधानिक सूचना; वाढत्या गुन्ह्यांवर कठोर पाऊलराज्यात अल्पवयीन मुला-मुलींसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ : आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती 

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभऔषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृह परिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध …

vishwatmaklokswamivarta

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद..

रेल्वे स्टेशन जामा मशीद येथे दावत – ए- इफ्तारचा.पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थिती.