vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

टोयोटा कंपनीचे उच्च अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट,शिक्षण, आरोग्य आणि सौर ऊर्जा निर्मिती साठी एकत्र काम करणार..    -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

टोयोटा कंपनीचे उच्च अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट,शिक्षण, आरोग्य आणि सौर ऊर्जा निर्मिती साठी एकत्र काम करणार..    -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

          राज्य प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, -जिल्ह्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात टोयाटो कंपनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडी , शाळा पायाभूत सुविधा ,सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात जिल्हा प्रशासनासोबत काम करण्यास तयार असल्याचा आज झालेल्या बैठकीत निर्णय झाला.

 टोयाटो कंपनीचे देशाचे मुख्य कार्यकारी उपाध्यक्ष सुदीप गुलाटी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची भेट घेऊन चर्चा केली.

 जिल्ह्यातील विविध विकास कामांमध्ये टोयाटो कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विकासात्मक काम करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत लोकाभिमुख सुविधा उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली. शिक्षण, आरोग्य, सौर ऊर्जा याक्षेत्रात हा सहभाग असेल.

टोयाटोचे कार्यकारी उपाध्यक्ष सुदीप दळवी म्हणाले की, कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी उपलब्धतेसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञानाबरोबरच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी शिक्षणा आणि तांत्रिक शिक्षण यावर काम करीत आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये मूलभूत बदल करण्यामध्ये टोयाटो कंपनी जिल्हा प्रशासनासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहकार्य कंपनीमार्फत करण्यात येईल. जिल्हाप्रशासनातर्फे एकत्र काम करण्यासाठी येणाऱ्या सर्व परवानगी यामध्ये सहकार्य देण्याची ग्वाही दिली. सामाजिक सेवेचे दायित्व हे खऱ्या अर्थाने जिल्हा प्रशासनासोबत काम करून गरजवंत व्यक्तींचे जीवन बदल करण्यामध्ये होणार असल्याचे समाधान यावेळी टोयाटो कंपनीचे मुख्य संपर्क अधिकारी सुदीप दळवी यांनी व्यक्त केले.0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

योजनेसाठी जमीन खऱेदी करणार : समाजकल्याण कार्यालय जमीनविक्रीस इच्छूकांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारत – पोर्तुगाल पुनर्प्रस्थापित राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढविण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक- राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्तांतरणबाबत शासन निर्णयात सुधारणा पात्र प्रकल्पग्रस्तांना होणार निर्णयाचा लाभ- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताह निमित्त मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा संपन्न

विदर्भातील उद्योगवाढीच्या सर्व संभावनांचा कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री- सीआयआयच्या विदर्भ विभागीय कार्यालयाने अभ्यास करावा – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी