vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासनाचे चार, आठ, नऊ व ११ वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे चार, आठ, नऊ व ११ वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस…

राज्य प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या चार, आठ, नऊ व ११ वर्षे मुदतीच्या प्रत्येकी १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रत्येक रोख्यासाठी स्वतंत्र पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

३० सप्टेंबर, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई फोर्ट येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बोली ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाच्या आहेत

यामध्ये स्पर्धात्मक बोली संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर कराव्यात. तर अस्पर्धात्मक बोली ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर कराव्यात. लिलावाचा निकाल त्याच दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बोलीदारांकडून रकमेचे प्रदान १ ऑक्टोबर, २०२५ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील

चार वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी १० सप्टेंबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक १० सप्टेंबर, २०२९ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा ६.७४ टक्के दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक मार्च १० आणि सप्टेंबर १० रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

तर आठ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी १० सप्टेंबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक १० सप्टेंबर, २०३३ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा ७.१८ टक्के दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक मार्च १० आणि सप्टेंबर १० रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल

तसेच नऊ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी १० सप्टेंबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक १० सप्टेंबर, २०३४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा ७.२४ टक्के दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक मार्च १० आणि सप्टेंबर १० रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल११ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी २४ सप्टेंबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक २४ सप्टेंबर, २०३६ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा ७.२७ टक्के दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक सप्टेंबर २४ आणि सप्टेंबर २४ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

संबंधित पोस्ट

पीकस्पर्धेत सहभाग घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

आरोग्यविषयक सर्वेक्षणाची माहिती-देवून सहकार्य करण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे-भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्याने- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे-दुचाकी, चार चाकी, परिवहन व ऑटो या नवीन मालिका सुरू

नव्या मुंबईत एसएससी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष बसगाड्यांची व्यवस्था..