vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय सशस्त्र सैन्या दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी..

भारतीय सशस्त्र सैन्या दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी..

 

 राज्य प्रतिनिधी  भारतीय सैन्यादल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combind Defence Service (CDS) या परीक्षेची ची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि.19 जानेवारी ते 03 एप्रिल 2026 या कालावधीत CDS कोर्स क्रं.66 आयोजित करण्यात येत असून रायगड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रायगड-अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) यांनी केले आहे.

 रायगड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्या दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रायगड-अलिबाग येथे दि. 18 जानेवारी 2026 रोजी पूर्वी कार्यालयात येऊन भेटावे कार्यालयात येण्यापूर्वी येते वेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील CDS – 66 कोर्ससाठी (किंवा संबधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानें प्रिंट दिलेल्या प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावेया सी.डी.एस.वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस.(CDS) या परिक्षेकरिता ऑनलाईनव्दारे अर्ज केलेला असावा यापैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत.

   अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्ष्‍ण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आय डी : training.pctcnashik@gmail.com, pctcoic@yahoo.in व दुरध्वनी क्रं. 0253-2451032 किंवा व्हॉटसअप क्रं. 9156073306 वर कार्यालयील वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा. कोर्स कालावधीत प्रशिक्ष्‍ाणार्थींना नि:शुल्क प्रशिक्ष्‍ाण , निवास, व भोजन दिले जाणार आहे.

 

०००००००

संबंधित पोस्ट

राज्यातील 🚨 पोलादपूरात मुसळधार पाऊस !  सह्याद्री डोंगररांगांमध्ये रात्रभर १०५ मिमी पावसाची नोंद, एकूण पावसाची नोंद १५७१ मिमीवर! 🌊 सावित्री नदी उत्तर वाहिनीने पात्र ओसंडले. 🏠 शहरातील मंदिर, घाट, मार्केट पाण्याखाली….

देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची – राज्यपाल जिष्णू देव वर्मा,महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित-शाश्वत शेतीसाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या दोन प्रकल्पाचे लोकार्पण

राजधानीत मराठी चित्रपट प्रेमींसाठी नवे व्यासपीठ दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे शुक्रवारी उद्घाटन

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश 

अभिप्राय कक्षामुळे पारदर्शक प्रशासनाची नवी दिशा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा राज्यस्तरीय सन्मानमहाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त सन्मान