vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त सहा महसूली विभागात गीत, नृत्य, नाट्य यांच्या सादरीकरणातून देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

वंदे मातरम् या देशभक्तीपर गीत व नृत्याविष्कारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी, रात्रौ ८:१५वा. रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वंदे मातरम्’ हा देशभक्तीपर गीत व नृत्याविष्कार चा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात गायक राहुल गंगाधर जेठे, गायिका प्रिया सतिश पवार आणि भाग्यश्री अभ्यंकर व समुह, तसेच नृत्याविष्कार: फ्युजन इंस्टिट्यूट ऑफ डांस समुह, यांचा सहभाग असून प्रवेश विनामूल्य आहे तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि आस्वाद घ्यावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

पुणे येथे हिंदूराष्ट्र जागृती सभा यांचे जाहीर आमंत्रण

महाडीबीटी पोर्टलवरून प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

भारतीय नौदल तिरुवनंतपुरम येथे भव्य परिचालन प्रात्यक्षिकासह नौदल दिन 2025 साजरा करणार

vishwatmaklokswamivarta

मुंबईत ११ व १२ जानेवारीला फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन…

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बाधित नवजात बालकांच्या प्रकृतीची विचारपूस जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी

vishwatmaklokswamivarta

बनावट वेबसाइट्स,अप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा-परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta