vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (दि.११) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (दि.११) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 

       छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.११ फेब्रुवारी २०२६ रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे, या मेळाव्याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा,असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सुरेश बहुरे यांनी केले आहे.

या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील टोयोटा किर्लोसकर मोटर, परकिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कॉस्मो फिल्म्स प्रा. लि., औरंगाबाद ॲटो ॲसिलरी, संजीव ॲटो पार्ट़स मॅन्यूफॅक्चरिंग लिमिटेड, रूचा इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड, साई सुप्रिम इक्वीपमेंट, चिकलठाणा, वार्नर इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, शेंद्रा, क्लॅड मेटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्सल/ रूचा इंजिनियरिंग, बागला गृप, अलंकार इंजिनिअरींग ईक्युपमेंट प्रा. लि. शेंद्रा, एस एस कंट्रोल प्रा.लि., इंडूरन्स टेक्नोलॉजी लि., निपूण स्कील्स / मल्टीसर्व्हिसेस, एआरएमएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मेडिरिक्रूटर्स – पॅन इंडिया, लाईफ इंश्यूरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, धूत ॲटोमोटिव सिस्टीम प्रा. लि., रिझल्ट सिएक्स प्रा. लि., युनिकेअर हेल्थ केअर प्रा. लि., क्वेस क्रॉप प्रा. लि., श्री गणेश प्रेस प्रा. लि., शॉपर्स स्टॉप प्रा. लि., समर्थ इलेक्ट्रोकेअर प्रा. लि., अजिंक्य ग्रूप ऑफ बिझनेस, पंचशिल बिल्डकॉइन, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड, हम्मा फूड़स प्रायव्हेट लिमिटेड, पिएमएम परिहारमिलन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, कैझन प्लास्टोमोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, इंस्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, डॉ. रेड्डी फाउंडेशन, व्हीज्युअल इंन्फोसिस्टीम प्रा.लि., एक्सीडी इंडिया प्रा. लि., बुश इलेक्ट्रोमेक ॲड इंजिनिअरींग प्रा.लि., नाथ फॉईल्स प्रा.लि., नेटलॅप ईट ट्रेनींग ॲड सोलूशन अशा नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. या विविध ३७ आस्थापनांकडून २५३३ रिक्तपदे प्राप्त झालेली असून ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत घेणार आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा, आय टी आय, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक युवक युवतींसाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा बायोडाटाच्या प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदांसाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0240-2954859 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. बुधवार दि.११ रोजी सकाळी साडेनऊ वा. कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देवून रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशी राज्य शासनाची भूमिका असून राज्य शासन एसटी कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड;गुरुवारी (दि.२ एप्रिल) विशेष सभा

मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू होणार;मतदारांनी बीएलओ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

जिल्ह्यात प्राणी कल्याण कायद्याच प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

एक दिवा सैनिकांसाठी – दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात..

vishwatmaklokswamivarta