vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इमाव बहुजन कल्याण विभागामार्फत समाजसेवी संस्थांना पुरस्कार; प्रस्ताव मागविले

इमाव बहुजन कल्याण विभागामार्फत समाजसेवी संस्थांना पुरस्कार; प्रस्ताव मागविले

        छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत पुरस्कारांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्यात येतात. त्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून इच्छुक व पात्र संस्थांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावा,असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

पुरस्कारांची नावे याप्रमाणे-

१) महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार२) नटराज पुरस्कार३) विश्वकर्मा पुरस्कार४) क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार

अटी व शर्ती :१) अर्जदार व्यक्ती / संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.२) अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरुपाचे कार्य केलेले असावे.३)अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमुद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.४) अपूर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत.

५) पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.इच्छुक संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव शनिवार दि.२१ पर्यंत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. अर्जाचा नमुना, शासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच अधिक माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक दयानंद कोकरे यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

लोकमान्य टिळक जन्मस्थळ परिसरातील मराठी भाषा विभागातर्फे पुस्तक दालनाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

मानखुर्द परिसरात ५ एकर शासकीय जागा अतिक्रमणमुक्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडून निष्कासनाची कारवाई

कर्जतजवळील ‘सुकून एम्पायर – हलाल टाउनशिप’ या धर्माधारित गृहप्रकल्पांवर बंदी घाला !* – हिंदु जनजागृती समितीची मागणी*कर्जत येथे ‘हलाल टाउनशिप’ विरोधात आंदोलन*

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईत निधन, संगीत क्षेत्रातील चिरतरुण सूर हरपला, सर्वत्र शोकभावना.♦️आशा भोसले यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा केली — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी बनवला नसेल तर लगेच बनवून घ्या !  कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य 

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन