vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोर्शीत एकात्मिक प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण;सर्व शासकीय कार्यालये आता एकाच छताखाली येणार

मोर्शीत एकात्मिक प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण;सर्व शासकीय कार्यालये आता एकाच छताखाली येणार

 

     अमरावती , प्रतिनिधी: मोर्शी येथील नागरिकांच्या सुविधेसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य एकात्मिक प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून प्रत्यक्ष इमारतीची पाहणी केली. याप्रसंगी खासदार डॉ. अनिल बोंडे, अमर काळे, आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर, राजेश वानखडे, नगराध्यक्ष प्रतीक्षा गुल्हाने, ईश्वर सलामे, सुवर्णा वरखडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार आणि तहसीलदार सागर ढवळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, मोर्शी येथील या नवीन इमारतीची रचना अत्यंत उत्तम असून, नागरिकांना विनाविलंब आणि पारदर्शक सेवा देणे हेच प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असावे. शासन सध्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आकृतिबंध अंतिम करत असून, पात्र व्यक्तींना पदोन्नती देऊन प्रशासन अधिक गतिमान केले जात आहे. ‘गतिमान शासन, पारदर्शी प्रशासन’ हे सूत्र घेऊन महसूल विभाग काम करीत आहे. शासनाने ‘जीवंत सातबारा’ लागू केला असून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिरांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी दिला जात आहे. तसेच, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेतून शेतकऱ्यांसाठी रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

     मोर्शी शहरात पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधण्यासाठी निधी दिला जाईल. येथील घनकचऱ्याच्या निर्मूलनावर काम केले जाईल. शहराचे सीटीएस करून दिले जाईल. यामुळे येथील रहिवाशांच्या मालमत्तेला कायदेशीर आधार मिळेल शिवाय शहराचा नकाशा अधिकृतरित्या अद्ययावत होईल. तसेच तालुक्यातील घरकुल पट्टेवाटपही लवकरच केले जाईल, असे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

ही नवीन प्रशासकीय इमारती सर्व सोयी-सुविधांनी युक्त आहे. ही इमारत 12.80 कोटी रुपये खर्चून 2728.4 चौरस मीटर क्षेत्रफळात उभारण्यात आली आहे. इमारतीच्या तळमजल्यावर तहसील आणि दुय्यम निबंधक कार्यालय, पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी, कृषी विभाग, उपकोषागार आणि सहाय्यक निबंधक कार्यालय तर दुसऱ्या मजल्यावर मीटिंग हॉलसह महिला व बालकल्याण विभाग कार्यरत असणार आहे. सर्व कार्यालये आता एकाच ठिकाणी आल्यामुळे नागरिकांची होणारी भटकंती थांबणार असून प्रशासकीय कामात मोठी गती येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सागर ढवळे यांनी केले, तर यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासन निर्णय संग्रहाचे विमोचनही करण्यात आले…

000000

संबंधित पोस्ट

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजनअधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे   

vishwatmaklokswamivarta

उद्योजकांच्या पंखाना शासन बळ देणार -पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १२ हजार कोटींचे सामंजस्य करार, २१ हजार रोजगार निर्मिती

जिल्हा गंथोत्सवाचे थाटात उद्घाटन;सुजाण समाज घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची चळवळ व्हावी- पुरुषोत्तम भापकर

vishwatmaklokswamivarta

पिंपरी-चिंचवड इथं विषारी दारु प्यायल्यामुळे १३ जणांचा मृत्यू अनेकजण गंभीर. रुग्णालयात उपचार सुरू

GSDA च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे श्रमदानातून जलसंधारणशरणापूर येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमाला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन