vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आणि यशवंत पंचायतराज अभियान विभागस्तरीय पुरस्कार व महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आणि यशवंत पंचायतराज अभियान विभागस्तरीय पुरस्कार व महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

📍 पुणे प्रतिनिधी

जिल्हा परिषद, पुणे आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यावतीने कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर येथे आयोजित ‘मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आणि यशवंत पंचायतराज अभियान विभागस्तरीय पुरस्कार व महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, सावित्री जत्रा हे नाव सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना, त्यांच्या सक्षमीकरणाच्या कार्याला समर्पित आणि साजेसे आहे. सावित्रीबाईंनी शिक्षण आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा मार्ग दाखवला, त्याच विचारांची जत्रा आज ग्रामीण भागातील शेकडो महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने पावन झालेल्या भूमीत, त्यांच्या नावाने सुरु असलेली ‘सावित्री जत्रा’ हे केवळ एका प्रदर्शनाचं नाव नाही तर महिलांना स्वावलंबी करणारी एक चळवळ आहे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये*जिल्हाधिकारी संतोष पाटील*

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू- शालेय शिक्षण विभागाची माहिती –

vishwatmaklokswamivarta

चिखलदरा महोत्सवात महिला बचतगट प्रदर्शन, विक्री केंद्र स्थापन करून व्यापकता निर्माण कराव-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*सायन्स कोर मैदान येथे विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सव जिल्हा प्रदर्शन व विक्री – 2026

राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यात ३४०६ प्रकरणे निकाली28 कोटी 48 लाखाहून अधिक रक्कम वसूल..

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाण्यात यशस्वी; आपत्कालीन तयारीची प्रभावी चाचणी*

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाचे उद्घाटन व हिरवी झेंडी दाखवून रवाना