vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जि.प, पं.समिती सदस्यासाठी अलिबाग येथे कार्यशाळेचे आयोजन

रायगड जि.प, पं.समिती सदस्यासाठी अलिबाग येथे कार्यशाळेचे आयोजन

 अलिबाग प्रतिनिधी  | रायगड जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापतींसाठी ‌‘जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कामकाज‌’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अलिबाग येथे करण्यात आले आहे. या कार्यशाळेला तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. रायन फाऊंडेशन आणि ‌‘राटा‌’तर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

 शनिवार 2 मे रोजी अलिबाग होराझन सभागृह येथे ही कार्यशाळा होणार आहे. दोन सत्रात होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी तसेच जिल्हा परिषदचे अध्यक्ष मंगेश वाडकरी उपस्थित राहणार आहेत.

माजी आय.ए.एस. अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. श्री. विजय सूर्यवंशी, निवृत्त अधिकारी एन. टी. देशले ( यशदा) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, जिल्हा परिषद यंत्रणेचे स्थान आणि महत्व, आर्थिक नियोजन आणि अर्थसंकल्प, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी रोहयो मंत्री भरत गोगावले, खासदार सुनीलजी तटकरे (रायगड लोकसभा), आमदार महेंद्र दळवी, राजिपचे अध्यक्ष मंगेश वाडकरी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसेच रायगड पोलिस अधीक्षक आँचल दलाल उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडूण आलेल्या सदस्य, सभापती, नगरसेवक, सरपंच यांच्या साठी हे मार्गदर्शन दिशा दर्शक ठरणारा आहे. त्यामुळे इच्छुकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अमृतची विशेष अर्थसहाय्य योजना; पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ महत्त्वाचे – प्रा. मोहन नेहरे  

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील सीता मातेचे जन्मस्थान असलेल्या पुनौराधाम मंदिर आणि परिसराच्या समग्र विकासासाठी केले भूमिपूजन,विरोधी पक्षांना घुसखोरांची मते हवी आहेत मात्र बिहारचे लोक याचा स्वीकार करणार नाहीत

राज्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी केले पंतप्रधान रक्षक दलाचे नेतृत्व

स्टँड-अप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या वक्तव्यांवर शासनाची कठोर भूमिका- गृह राज्यमंत्री योगेश कदम