vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

देवनार डम्पिंग ग्राऊंडमुळे शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः नरकयातना*पालिकेच्या बेजबाबदार कारभारावर खासदार संतप्त; खोट्या अहवालांचा भांडाफोड करत अधिकाऱ्यांची खरडपट्टी*

देवनार डम्पिंग ग्राऊंडमुळे शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः नरकयातना*पालिकेच्या बेजबाबदार कारभारावर खासदार संतप्त; खोट्या अहवालांचा भांडाफोड करत अधिकाऱ्यांची खरडपट्टी*

मुंबई प्रतिनिधी- देवनार डम्पिंग ग्राऊंडमुळे शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः नरकयातना बनले असताना पालिका अधिकारी मात्र “सर्व काही सुरळीत” असल्याचा दिखावा करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर खासदार संजय दिना पाटील यांनी जोरदार टीका करत बैठकीतच त्यांची कानउघाडणी केली.

चेंबूर पश्चिम येथील पालिका कार्यालयात आयोजित बैठकीत उप आयुक्त संध्या नांदेडकर, विविध विभागांचे अधिकारी, एमएमआरडीए, एसआरए, म्हाडा तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र बैठकीत नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकताना दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या खासदारांनी “लोक मरत आहेत आणि अधिकारी फक्त कागदोपत्री काम दाखवत आहेत” अशा शब्दांत प्रशासनावर हल्लाबोल केला. देवनार डम्पिंगमधून निघणाऱ्या विषारी वायू, दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. त्वचारोग, श्वसनाचे विकार आणि अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी बैठकीत मांडली. मात्र पालिका अधिकारी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगून स्वतःची पाठ थोपटत होते.

याचवेळी शताब्दी रुग्णालयातील गंभीर अनागोंदीचाही भांडाफोड झाला. रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असल्याचा दावा मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. मात्र खासदारांनी बैठकीतच एक धक्कादायक व्हिडीओ दाखवत अधिकाऱ्यांचे खोटेपण उघड केले. त्या व्हिडीओमध्ये स्वच्छता कर्मचारी रुग्णांना टाके मारताना तर सफाई कामगार ईसीजी काढताना दिसत होते. हा प्रकार समोर येताच बैठकीत एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना अधिकारी खोटी माहिती देऊन जनप्रतिनिधींनाच दिशाभूल करत आहेत. लोकांना उपचार नाहीत, सुरक्षित घरे नाहीत, मूलभूत सुविधा नाहीत व अधिकारी मात्र सगळे अलबेल असल्याचे सांगत आहेत. हा सरळसरळ बेजबाबदारपणा आहे, अशा शब्दांत खासदारांनी प्रशासनावर ताशेरे ओढले.

00000

संबंधित पोस्ट

शूटिंग स्टार्स २०२५’ सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे ५ डिसेंबर रोजी आयोजन

vishwatmaklokswamivarta

शहर सुंदर ठेवणा-या सुंदर हातांचा गौरव करणे आनंददायी – महापौर श्रीम.सुजाता पाटील

जिल्हा परिषद, ठाणे“महाश्रमदानः एक दिवस, एक तास, एक साथ” – जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये उत्साहात उपक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत प्रदूषणकारी 19 बांधकामे बंद – 42 बांधकामांना नोटीसा समीर ॲप व प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या वेबसाईटवरुन हवा गुणवत्ता विषयक अधिकृत माहिती घेण्याचे आवाहन

खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 महाराष्ट्राच्या वेदांत आणि प्राची यांनी पटकावले स्वर्णपदक..

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*