vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांची पिंपरी गावात भेट शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची केली विचारपूस..

जिल्हाधिकाऱ्यांची पिंपरी गावात भेट शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची केली विचारपूस..

 

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज पिंपरी ता. कन्नड या गावास भेट दिली. येथे त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली व जनगणना कार्याची पडताळणी केली.

त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी एम, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन तसेंच अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्यग्रस्त कुटुंबाची भेट,जिल्हाधिकारी गौडा यांनी पिंपरी या गावातील विष्णू काशिनाथ जोगदंड या दिवंगत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. या कुटुंबाला विविध शासकीय योजनांचे देण्यात आलेले लाभ, त्यांची सद्यस्थिती याबाबत आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच आगामी हंगामासाठी बियाणे थैली दिली.

जनगणना पडताळणी,याच गावात झालेल्या जनगणना कार्याची पडताळणी ही जिल्हाधिकारी गौडा यांनी केली. बाबुलाल भाऊलाल कुदळे यांच्या कुटुंबाची गणना झाल्याची खात्री त्यांनी मोबाईल अँपवर करून खात्री केली.

00000

संबंधित पोस्ट

रामनगर येथे दीपावली व पाडवा स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…

पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण

वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबरपर्यंत मागविले

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाताअहिल्यादेवी होळकर असे करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• गतीसह गुणवत्तने विकासकामे पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य• मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण-    महानगरपालिकेद्वारे विहित मुदतीच्या आत पुलाचे काम पूर्ण

सिपेट अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात…

vishwatmaklokswamivarta