vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाण्यात विशेष लोककल्याण मेळावा

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाण्यात विशेष लोककल्याण मेळावा

बुलढाणा,द प्रतिनिधी: नगर परिषद बुलढाणा अंतर्गत पीएम स्वनिधी (PM SVANidhi) योजनेला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहरातील पथविक्रेत्यांसाठी विशेष लोककल्याण मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नवीन लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत असून योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे

शहरातील फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, फास्ट फूड विक्रेते तसेच इतर लघु व्यावसायिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात २५ हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते

नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना ७ टक्के व्याज अनुदानाचा लाभ मिळणार असून विविध पूरक योजनांचाही लाभ दिला जाणार आहे. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना बँकांमार्फत क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली

हा कार्यक्रम नगर परिषद बुलढाणाच्या नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. शहरातील सर्व पात्र पथविक्रेत्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी नगर परिषद बुलढाणा येथील DAY-NULM केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन नगर परिषद बुलढाणाचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जनगणना 2027 अंतर्गत दिल्ली येथील महारजिस्ट्रार कार्यालयाच्या पथकाची जालना जिल्ह्यास भेट दिल्ली येथील पथकाकडून जालना जिल्ह्यातील जनगणनेच्या कामकाजाचे कौतुक….

आनंददायी निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सेवानिवृत्त १७१ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान..

नागपूर विभागातील १,५८२ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १३.८१ कोटींची मदत…

शेतकऱ्यांनी विमा संरक्षित ई-पीक पाहणी करुन घ्यावी

कृषी समृद्धी योजनेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

vishwatmaklokswamivarta

राजेगाव येथील शेतकरी उगले यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठींबा…