vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई प्रतिनिधी#चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे येथे घेतला. यावेळी खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

चाकण परिसरातील विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. चाकणच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने कामाचा रोडमॅप तयार केला असून समितीला आवश्यक त्या सूचना व मागण्या ऐकून घेऊन काम करण्यास पूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

चाकणच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकाच व्यासपीठावर आल्या असून, ही सकारात्मक बाब आहे. समितीच्या माध्यमातून विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

विशेष लेख -:अभिजात मराठी भाषा..जतन आणि संवर्धन

vishwatmaklokswamivarta

राजेगाव येथील शेतकरी उगले यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठींबा…

ॲग्रीस्टॅक नोंदणी, शून्य प्रलंबितता कामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी स्वामी

शिवमय वातावरणात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन उत्साहात साजरा◾ छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव…

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विकासाचे नियोजन करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा सामाजिक न्याय दिन साजरा घर घर संविधान योजनेचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

vishwatmaklokswamivarta