vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नाशिक शहरासाठी दाखल झालेल्या ५० ई-बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

नाशिक शहरासाठी दाखल झालेल्या ५० ई-बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

नाशिक, प्रतिनिधी : नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत ५० ई-बसेसचे नाशिककरांच्या सेवेत दाखल होत आहेत. या बसेसच्या माध्यमातून नागरिकांना विश्वासार्ह व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नाशिक शहरासाठी दाखल झालेल्या ५० ई-बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत नाशिक शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या १२ मीटर लांबीच्या ५० ई-बसेस शहरात दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिक ई-बसेसचा समावेश झाल्यामुळे नागरिकांना विश्वासार्ह व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासही हातभार लागणार आहे.

डिझेल बसेसच्या तुलनेत ई-बसेसच्या वापरामुळे परिचालन खर्चातही बचत होणार आहे. नाशिक शहराचा विकास आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यात आणखी बसेस उपलब्ध होणार असून त्यातून नागरिकांना अधिक व्यापक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,अनधिकृत पाणी उपसा केल्यास वीजपुरवठा खंडित करा,पाणीसाठा आरक्षण व कृषी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न

डॉ.कराड यांनी घेतला औट्रम घाट भुयारी मार्ग,गॅस पाईपलाईनसह विविध विषयांचा आढावा

आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज· ‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त वैचारिक अभिवादन

दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेलेले ३७ नागरिक सध्या सागा (चीन) येथे सुरक्षित आहेत. सर्वांची प्रकृती ठीक असून, त्यांच्यामध्ये दोन डॉक्टरही आहेत.