vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटीचा प्रश्न थेट मुंबईत; उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांच्या तक्रारीची वरिष्ठ पातळीवर दखल ,परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन माइंड यांच्याकडून तक्रारीची दखल बंद बससेवा व प्रवाशांच्या तक्रारींची चौकशी होणार निवेदन जालना विभागाकडे वर्ग करून कार्यवाहीचा अहवाल मागविला…

जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटीचा प्रश्न थेट मुंबईत; उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांच्या तक्रारीची वरिष्ठ पातळीवर दखल ,परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन माइंड यांच्याकडून तक्रारीची दखल बंद बससेवा व प्रवाशांच्या तक्रारींची चौकशी होणार निवेदन जालना विभागाकडे वर्ग करून कार्यवाहीचा अहवाल मागविला…

भोकरदन, प्रतिनिधी)-जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर–माहोरा–बरंजळा साबळे–नळणी–जवखेडा–ठोंबरे–केदारखेडा–राजूर–तळेगाव–फुलंब्री या मार्गावरील बंद करण्यात आलेली एसटी बससेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी, तसेच प्रवाशांना बसमध्ये न घेण्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला आता मुंबईतील एसटी महामंडळाच्या

मध्यवर्ती कार्यालयातून दखल घेण्यात आली आहे.जाफराबाद आगारामार्फत ३ जुलै २०२६ रोजी सुरू करण्यात आलेली ही बससेवा परिसरातील अनेक गावांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली होती. विद्यार्थी,शेतकरी, महिला, कामगार, रुग्ण तसेच छत्रपती संभाजीनगर येथे विविध कामांसाठी ये-जा करणार्‍या नागरिकांना या सेवेचा मोठा फायदा होत होता.मात्र, सेवा सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी प्रवाशांना बसमध्ये न घेणे, बसथांब्यावर योग्य प्रतिसाद न देणे तसेच त्यानंतर प्रवासी संख्या कमीअसल्याचे कारण देऊन सेवा बंद करण्याचे प्रकार होत असल्याची तक्रार करण्यात आली होती.या प्रकरणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भोकरदनउपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनमहामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन माइंड यांच्याकडे मेलद्वारे निवेदन सादरकरून बससेवा तात्काळ पूर्ववत करण्याची तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती. निवेदनात राजूरसह चनेगाव,चिखली, दाभाडी,तळेगाव, टाकळी, लिधोरा आदी गावांतील प्रवाशांना बससेवेचा योग्य लाभ मिळतनसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तसेच, प्रवाशांना बसमध्येघेतले जात नसताना त्यानंतर प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देऊन बससेवा तोट्यात असल्याचे सांगणे योग्य आहे का, असा सवालही निवेदनातून उपस्थितकरण्यात आला होता. या संपूर्ण प्रकाराची वस्तुनिष्ठ तपासणी करून प्रवासी संख्या, बसच्या फेर्‍या, थांबे आणि प्रत्यक्ष प्रवासी सेवा यांचास्वतंत्रपणे आढावा घेण्याची मागणी करण्यात आली होती.मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाची दखल या निवेदनाची दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) नितीन माइंड यांच्या कार्यालयाकडून ते जालनाविभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे. संबंधित पत्रात,‘मेलद्वारे प्राप्त झालेले निवेदन हे आपल्या विभागाशी संबंधित असल्यानेपुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी आपणाकडे पाठविण्यात येत आहे. तसेच केलेली कार्यवाही संबंधितांना कळवून या खात्यास कळविण्यात यावी,’ असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता जालना विभागाचे विभाग नियंत्रकआणि जिल्हा वाहतूक अधिकारी या प्रकरणी नेमकी काय कार्यवाही करतात, याकडे

परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.बससेवा पूर्ववत करण्याची प्रमुख मागणीया प्रकरणात बंद करण्यात आलेली जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर–फुलंब्रीबससेवा तात्काळ पूर्ववत करावी, प्रवाशांना बसमध्ये न घेतल्याच्यातक्रारींची चौकशी करावी, उपलब्ध पुराव्यांची तपासणी करावी तसेच दोषी

आढळणार्‍या संबंधित चालक, वाहक किंवा अधिकारी-कर्मचार्‍यांवर नियमानुसार,कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बससेवा पूर्ववत केल्यानंतर यामार्गावर वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत नियमित देखरेख ठेवून सर्व पात्र प्रवाशांना बससेवेचा लाभ मिळेल, याची खात्री करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.आता जालना विभागाच्या कार्यवाहीकडे लक्ष मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाकडून निवेदन जालना विभागाकडे पाठविण्यात

आल्याने या प्रकरणाला आता प्रशासकीय पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे बससेवा पुन्हा सुरू होते का, तक्रारींची चौकशी होते का आणिसंबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे जाफराबादसह राजूर, केदारखेडा,नळणी, बरंजळा साबळे, तळेगाव, फुलंब्री आणि परिसरातील नागरिकांचे लक्षलागले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित

असलेली ही बससेवा केवळ नफा-तोट्याच्या निकषावर न पाहता, प्रवाशांनाप्रत्यक्षात योग्य सेवा मिळते आहे का, याचा विचार करून ही सेवा तात्काळपूर्ववत करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

संबंधित पोस्ट

अलिबाग-वडखळ मार्गावर शनिवार-रविवारी जड वाहनांची वाहतूक बंद पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा निर्णय..

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत 10 मे रोजी

उच्च न्यायालयात सिंहगडएक्स्प्रेसच्या थांब्यासाठी-अशी मागणी पुणे प्रवासी संघाने केली

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर ! 🔥 १७ पैकी १६ जागांवर महायुतीचा विजय, तर १ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी.

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कोकण मंडळाने नवीन वर्षात घरकुल योजना- दोन हजार हून अधिक सदनिकांसाठी भव्य गृहनिर्माण सोडत 

vishwatmaklokswamivarta