vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नातेवाईकांपासून दूर असलेल्या बंद्यांसाठी कारागृहात रक्षाबंधन

नातेवाईकांपासून दूर असलेल्या बंद्यांसाठी कारागृहात रक्षाबंधन

बुलढाणा, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांच्या मानसिक परिवर्तनासाठी जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून विविध प्रशासकीय व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कारागृहातील बंदी आपल्या नातेवाईकांपासून दूर असल्याने त्यांना रक्षाबंधनाची उणीव भासू नये तसेच त्यांच्या मनात आनंदाचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जीवनविद्या मिशनच्या सदस्यांनी कारागृहातील सर्व बंदी तसेच कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा स्नेहबंध जपला. या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होऊन सकारात्मक वातावरण तयार झाले. कार्यक्रमास कारागृह अधीक्षक मेधा बाहेकर, तुरुंगाधिकारी उमेश नाईक तसेच जीवनविद्या मिशनच्या भुपाली तायडे, मंगला अनासने, मिनाक्षी बंड, गजानन उमाळे व संदीप तायडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभेदार दरेसिंग चव्हाण, हवालदार संजय मदरकर, कारागृह शिपाई राहुल पवार, आनंद पवार, दीपक वाघ यांच्यासह कारागृहातील इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

00000

संबंधित पोस्ट

उत्कृष्ट छायाचित्रांना ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मिळणार गौरव.! छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांसाठी पोलादपूर येथे मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘स्वप्ननिकेतन’ सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण; विविध विकास कामांचेही लोकार्पण

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद…

vishwatmaklokswamivarta

आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’ : नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख: राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध