vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

एनसीएमसी कार्डधारकांसाठी आता भीम ॲपद्वारे सहज टॉप अप करता येणार

एनसीएमसी कार्डधारकांसाठी आता भीम ॲपद्वारे सहज टॉप अप करता येणार

 

            मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. एनसीएमसी कार्डधारकांना आता भीम ॲपच्या माध्यमातून आपल्या कार्डचे टॉप अप करता येणार आहे. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नसून, मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येणार आहे.      एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांच्या एनसीएमसी कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सुविधेला अधिक गतिमान आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने १५ सप्टेंबर २०२६ पासून भीम ॲपद्वारे एनसीएमसी कार्ड टॉप अपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.       या सुविधेचा वापर करण्यासाठी एनसीएमसी कार्डच्या पाठीमागील क्यूआर कोड भीम ॲपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर उपलब्ध प्रक्रियेनुसार टॉप अप करता येईल. त्यामुळे प्रवाशांना एनसीएमसी कार्डमध्ये आवश्यकतेनुसार रक्कम तत्काळ जमा करण्याची सुविधा मिळणार आहे.         एसटी महामंडळाच्या डिजिटल प्रवासी सेवांना अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी डिजिटल सुविधा, अधिक सुलभ आणि अधिक गतिमान प्रवास’ या उद्देशाला या सुविधेमुळे आणखी बळ मिळणा      विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्डचा वापर अधिक सुलभ होणार आहे.

000

 

संबंधित पोस्ट

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट महामंडळानं मुंबईत ब्रिक्स वेव्हज बाजारचं केलं आयोजन.

सातारा जिल्ह्याचे शेतीत ऐतिहासिक पाऊल; कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित फळशेतीचा यशस्वी शुभारंभ

सक्षम उद्योजक बनवण्यावर भरअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम…

डिजिटल पद्धतीने होणार जनगणना – २०२७ : प्रक्रिया होणार दोन टप्प्यांत पूर्ण-जिल्ह्यात ३० चार्ज अधिकारी व हजारो प्रगणकांची नियुक्ती विविध ठिकाणी प्रशिक्षणास सुरुवात

जालना जिल्ह्यातील प्राचीन हस्तलिखितांचे होणार दस्तऐवजीकरण

टेक-वारी २.०’ प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ‘डिजिटल युगातील डेटा सुरक्षेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन