आताची मोठी बातमी -मुंबईत झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
या अंतर्गत १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांनी अनधिकृत बांधकामे स्वतःहून तात्काळ हटवावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं दिला आहे.
मुंबईतील सर्वात मोठे झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे होत आहेत येथे परिसरात तील मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांची अनाधिकृत बांधकाम धारावी पुनर्वसन प्रकल्प सुरू असतानाही अनाधिकृत बांधकाम करण्यात येत आहे याबाबत सामाजिक संस्थांनी अनेक तक्रारी दिल्या त्यानुसार आज पर्यंत कारवाई झाली नव्हती परंतु मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांच्या हद्दीतही सर्वच वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम होत आहे संबंधित अधिकारी कारवाई करत नव्हते यामुळे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे खोपावली होती आता प्रशासनाने दिलेल्या या आदेशानंतर धारावीतही मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामावर कारवाई सुरू होणार असल्याची चर्चा आहे तर धारावीतील राजकीय कॉन्ट्रॅक्टर माफिया यांना एमआरटीपी ही लावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते