vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गणेशोत्सवात संकलन झालेल्या 71.990 टन निर्माल्यापासून खतनिर्मिती – उद्यानांसाठी होणार वापर

गणेशोत्सवात संकलन झालेल्या 71.990 टन निर्माल्यापासून खतनिर्मिती – उद्यानांसाठी होणार वापर

 

        नवी मुंबई प्रतिनिधी  14 सप्टेंबरपासून अत्यंत उत्साहात संपन्न झालेला श्रीगणेशोत्सव नवी मुंबईकर नागरिकांनी महापौर श्रीम.सुजाता पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेमार्फत ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करावा अशा केलेल्या आवाहनास अनुसरून पर्यावरणशील दृष्टीने साजरा केला.

          यामध्ये शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांना ‘पर्यावरण व स्वच्छतामित्र’ प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा मान राखून नागरिकांनी मोठया संख्येने 6 फूटापेक्षा कमी उंचीच्या श्रीगणेशमूर्तींचे 156 इतक्या मोठ्या संख्येने विभागवार बनविलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये विसर्जन करुन पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी योगदान दिले.

          त्याचप्रमाणे श्रीमूर्तीसोबत विसर्जनस्थळी आणले जाणारे निर्माल्य ओले व सुके अशा वेगवेगळ्या निर्माल्य कलशातच टाकावे या आवाहनालाही नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला. श्रीगणेशोत्सवातील 6 विसर्जन दिवसांमध्ये 22 नैसर्गिक व 156 कृत्रिम विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या निर्माल्य कलशात 71 टन 990 किलो इतके निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य संकलित करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने स्वतंत्र निर्माल्य वाहतुक वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजूसिंह चव्हाण व श्री. नरेश अंधेर आणि सर्व स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांनी स्वच्छताकर्मींसह नियोजनबध्द रितीने ही निर्माल्य संकलन मोहीम राबविली.

          गणेशोत्सवात श्रीमुर्तीसोबत विसर्जनस्थळी येणा-या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ‘ओले निर्माल्य’ तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे ‘सुके निर्माल्य’ ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळ्या निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती.

         अशाप्रकारे ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या संकल्पनेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सव विसर्जन कालावधीत गौरींसह सातव्या दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी सर्वाधिक 25.990 टन तसेच दीड दिवसांच्या विसर्जनदिनी 14.510 टन निर्माल्य आणि अनंतचतुर्दशीदिनी दहाव्या दिवसाच्या विसर्जनप्रसंगी 10.950 टन निर्माल्य संकलित करण्यात आले. पाचव्या दिवाशी 12.555 टन तसेच सातव्या दिवशी 7155 किलो आणि 10 व्या दिवशी 870 किलो निर्माल्य संकलीत झाले. अशाप्रकारे संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत एकूण 71.990 टन इतके निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य स्वतंत्र वाहनाव्दारे तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे. यामधून महापालिका क्षेत्रातील उद्याने फुलविली जाणार आहेत.

          पर्यावरणशील दृष्टीकोन जपून त्याची प्रत्यक्ष कृतीशील अंमलबजावणी करण्यात नवी मुंबईकर नागरिक नेहमीच सक्रिय सहभागी होत असतात. अशाचप्रकारे गणेशोत्सवातही शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे, कृत्रिम तलावातच श्रीमूर्तींचे विसर्जन करणे, ओले व सुके निर्माल्य वेगवेगळे ठेवणे अशाप्रकारे नागरिकांचा स्वयंस्फुर्तीने पर्यावरणपूरक सहभाग लाभला असून त्याबद्दल महापौर श्रीम.सुजाता पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले आहेत.

0000

0

संबंधित पोस्ट

जागतिक लाफ्टर डे निमित्त धारावीतील लोकांसोबत हास्य डे उत्साहात संपन्न

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व जिल्हाधिकारी रायगड यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय अडचणी, तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

केंद्र सरकारच्या आयगॉट- ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक

सांगली जिल्ह्यात 4 कोटी 80 लाखांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा- सद्यस्थितीत एक टँकर, 7 विहिरींद्वारे पाणीपुरवठा – मागणी व आवश्यकतेनुसार नियोजन 

5 रुपयांच्या नोटा व 20 रू.ची नाणी कायदेशीर चलन; स्वीकार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न