vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पीक परिस्थितीची पाहणी

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पीक परिस्थितीची पाहणी

   जालना, प्रतिनिधी : पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागाची पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी पाहणी केली. पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी आज बदनापुर तालूक्यातील कडेगाव, गेवराई बाजार आणि गोकुळवाडी तसेच जालना तालुक्यातील गणेशनगर शिवारातील शेतांमध्ये जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे जालना आणि बदनापुर तालूका दौऱ्यात शेतकरी बांधवांना आधार देत म्हणाल्या की, नुकसानग्रस्त पिकांची अवस्था पाहिल्यानंतर परिस्थिती गंभीर आहे. परंतु शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. राज्य शासनाकडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषी कर्जाच्या वसुलीला स्थगिती आणि कृषीपंपांच्या चालू वीजबिलात सवलत देण्याचा समावेश आहे.

 पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा यासाठी प्रशासकीय स्तरावर नियोजन केले जात आहे. ज्या भागात चाऱ्याची तीव्र टंचाई आहे, तिथे तातडीने चारा डेपो सुरू करणे आणि गाळपेरा जमिनींचा योग्य वापर करण्याबाबत धोरण आखले जात असल्याचे पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले. शेतकरी आणि शेतमजुरांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बँक खात्यात तांत्रिक त्रुटी नसलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना मदतनिधीचे वाटप वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार अर्जून खोतकर, आमदार नारायण कुचे, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा अधिक्षक गहिनीनाथ कापसे, बदनापुर उपविभागीय अधिकारी लता बागुल यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करून गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील १४ शिक्षक आणि २ केंद्रप्रमुखांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक नागरिकाने जलव्यवस्थापन करणे काळाची गरज- आमदार डॉ. सुरेश खाडे- अभियान केवळ कागदावर न राहता आपल्या कृतीत उतरवा- पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणे ही काळाची गरज

जिल्ह्यात सन 2025 च्या तुलनेत सन 2026 मध्ये अपघातात घट 

vishwatmaklokswamivarta

सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना; विस्तारीत टप्पा-2 व 3 मध्ये जिल्ह्यातील 16 हजार 177 लाभार्थ्यांची जोडणी*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जेन ओ  पिक्सल ॲण्ड प्ले ॲण्ड ग्लोबल ई-स्पोर्ट गेम्स’ या कार्यक्रमाचे उद्घाटन