vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ठाणे जिल्ह्यात आरोग्यसेवांचा व्यापक विस्तार; १०७ उपक्रमांतून १४,७८२ नागरिकांना लाभआरोग्य तपासणी, NCD स्क्रीनिंग, मानसिक आरोग्य, पोषण, महिला आरोग्य, व्यसनमुक्ती व निरोगी जीवनशैली जनजागृतीला विशेष प्राधान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ठाणे जिल्ह्यात आरोग्यसेवांचा व्यापक विस्तार; १०७ उपक्रमांतून १४,७८२ नागरिकांना लाभआरोग्य तपासणी, NCD स्क्रीनिंग, मानसिक आरोग्य, पोषण, महिला आरोग्य, व्यसनमुक्ती व निरोगी जीवनशैली जनजागृतीला विशेष प्राधान्य

 

ठाणे, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात आरोग्य विभागांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना, सेवा, आरोग्य तपासण्या, जनजागृती व समुपदेशन उपक्रम अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे.

नागरिक प्रथम’ या दृष्टिकोनातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा प्रमुख उद्देश नागरिकांना दर्जेदार, सुलभ, तत्पर व नागरिक-केंद्रित आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, तसेच आरोग्य संस्थांची कार्यक्षमता अधिक सक्षम करणे हा आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर अभियानांतर्गत विशेष भर देण्यात आला आहे.

१०७ उपक्रमांतून १४,७८२ नागरिकांना आरोग्यसेवांचा लाभ

ठाणे जिल्ह्यात अभियानांतर्गत विविध आरोग्यविषयक उपक्रम, तपासणी शिबिरे, जनजागृती व समुपदेशन कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आले आहेत. उपलब्ध जिल्हास्तरीय संकलित माहितीनुसार एकूण १०७ शिबिरे व उपक्रमांच्या माध्यमातून १४,७८२ नागरिकांना विविध आरोग्यसेवांचा लाभ मिळाला आहे.

यामध्ये १२ आरोग्य तपासणी शिबिरांतून ३,७६० नागरिकांची तपासणी, NCD तपासणीमध्ये २,३४१ नागरिकांची तपासणी, तर मानसिक आरोग्य स्क्रीनिंग व समुपदेशनातून ७१९ नागरिकांना सेवा देण्यात आली आहे.

तसेच निरोगी जीवनशैली जनजागृतीच्या माध्यमातून १,५२६ नागरिकांपर्यंत, पोषण व अॅनिमिया जनजागृतीद्वारे १,५५९ नागरिकांपर्यंत आणि व्यसनमुक्ती जनजागृती व समुपदेशनाद्वारे १,१२० नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक संदेश पोहोचविण्यात आला आहे.

महिला आरोग्य व स्वच्छता, किशोरवयीन मुला-मुलींची क्षमता बांधणी, योग व ध्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे, मोतीबिंदू तपासणी तसेच आयुष्मान भारत कार्ड वाटप आदी उपक्रमांनाही अभियानात विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

माता व बाल आरोग्याला विशेष प्राधान्य

माता व बाल आरोग्याच्या दृष्टीने अभियानांतर्गत मध्यम व तीव्र अॅनिमियाग्रस्त गर्भवती महिलांना FCM (Ferric Carboxy Maltose) इंजेक्शन, किशोरवयीन मुला-मुलींची क्षमता बांधणी तसेच Early & Exclusive Breastfeeding संदर्भातील जनजागृती व क्षमता बांधणीवर भर देण्यात येत आहे.

महिला व किशोरवयीनांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन आरोग्यविषयक माहिती, प्रतिबंधात्मक उपाय आणि आवश्यक मार्गदर्शन नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान

उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या तपासणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित विशेष आरोग्य शिबिरांमध्ये मधुमेह, रक्तदाब, मोतीबिंदू तसेच कर्करोग तपासणीचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच ३० वर्षांवरील नागरिकांमध्ये कर्करोगासह विविध असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान करण्यासाठी स्क्रीनिंगवर विशेष भर देण्यात येत आहे. वेळेत तपासणी व निदानाच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक उपचार व पुढील आरोग्यसेवेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दुर्मिळ आजारांपासून अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेपर्यंतअभियानांतर्गत दुर्मिळ आजारांसाठी कॉर्पस फंड, रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांची उपलब्धता तसेच ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर आवश्यक आरोग्यसेवा सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.

यामध्ये Hydroxyurea, Anti-Snake Venom (ASV), Anti-Rabies Vaccine (ARV) तसेच मधुमेह व उच्च रक्तदाबावरील औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उपाययोजनांचाही समावेश आहे.ग्रामीण, प्राथमिक व नागरी आरोग्यसेवांना चालनाअभियानाच्या माध्यमातून आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये आरोग्य तपासणी तसेच CHO, ANM, MPW व ASHA यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासारख्या उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.नागरी भागात UPHC स्तरावर आरोग्य शिबिरे आयोजित करण्याबरोबरच जनआरोग्य समिती, महिला आरोग्य समिती व एकात्मिक आरोग्य समिती यांच्या नियमित बैठका घेऊन आरोग्यसेवांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य व उपचाराचा पाठपुरावा‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ आरोग्य शिबिरांच्या आयोजनापुरते मर्यादित न राहता आरोग्यसेवा, जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य, आजारांचे लवकर निदान, उपचाराचा पाठपुरावा आणि नागरिकांचा सहभाग यांना एकत्र आणणारे व्यापक अभियान म्हणून राबविण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या विविध यंत्रणांच्या समन्वयातून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, आरोग्यसेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांना दर्जेदार, सुलभ व तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा केंद्रबिंदू आहे.

ठाणे जिल्ह्यातील सेवा संकल्प अभियानाची ठळक आकडेवारीठाणे जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत एकूण १०७ उपक्रम राबविण्यात आले असून, या उपक्रमांमधून १४,७८२ नागरिकांना विविध आरोग्यसेवांचा लाभ मिळाला आहे. यामध्ये १२ आरोग्य तपासणी शिबिरांतून ३,७६० नागरिकांची तपासणी, २ योग व ध्यान सत्रांद्वारे ५९८ नागरिकांना लाभ, महिला आरोग्य व स्वच्छतेच्या ७ उपक्रमांतून १,११० नागरिकांपर्यंत पोहोच, पोषण व अॅनिमिया जनजागृतीच्या ८ उपक्रमांतून १,५५९ नागरिकांना मार्गदर्शन, तसेच २ आयुष्मान भारत कार्ड वाटप उपक्रमांतून ३१३ नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. याशिवाय किशोरवयीन क्षमता बांधणीच्या ८ उपक्रमांतून ३५६, मानसिक आरोग्य स्क्रीनिंग व समुपदेशनाच्या ७ उपक्रमांतून ७१९, निरोगी जीवनशैली जनजागृतीच्या १२ उपक्रमांतून १,५२६, व्यसनमुक्ती जनजागृती व समुपदेशनाच्या ७ उपक्रमांतून १,१२०, NCD तपासणीच्या ८ उपक्रमांतून २,३४१, तर NCD संबंधित रुग्णांच्या पाठपुराव्याच्या १३ उपक्रमांतून ५२५ नागरिकांना सेवा व मार्गदर्शन मिळाले आहे.

00000000000

संबंधित पोस्ट

सेवा संकल्प अभियानातून खेर्डा येथे आरोग्य, स्वच्छता व शैक्षणिक उपक्रमांना चालना;गटविकास अधिकाऱ्यांची आरोग्य शिबिरासह विविध ठिकाणी भेट; स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

येळेगाव येथे #राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

यवतमाळ जिल्ह्यात 27 एप्रिल ते 19 मे 2026 दरम्यान विशेष कर्करोग निदान मोहीम…

नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या उपस्थितीत आरंभ,गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही लस सर्व नमुंमपा रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध

जोखीमग्रस्त तालखेड गावात २१३ नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी

आयुष ग्राम गुणवरे ता. फलटण येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न