vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सेवा संकल्प अभियानांतर्गत गंगापूर येथे महिला मेळावा

सेवा संकल्प अभियानांतर्गत गंगापूर येथे महिला मेळावा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी) : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत गंगापूर येथे बचत गटातील महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात ७०० हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.मेळाव्यात महिलांच्या आरोग्य व पोषणविषयक जनजागृती, महिला शेतकरी नोंदणी तसेच महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना व त्यांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन जान्हवी शेखर (भा.पो.से.) यांच्या हस्ते झाले. यावेळी गंगापूरचे नगराध्यक्ष संजयजी जाधव, तालुका कृषी अधिकारी जयभाये, दीपक गवळे, पोलीस विभागाचे पाटील, सुरेखा उटे, तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा चंदनसिंग राठोड, जिल्हा समन्वय अधिकारी मार्विन यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सुनीता सहाणे यांनी सांभाळली. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याबरोबरच आरोग्य, पोषण, कृषी व शासकीय योजनांविषयी जागरूकता वाढविण्यावर या मेळाव्यात भर देण्यात आला.

संबंधित पोस्ट

पालखी सोहळा उत्कृष्ट व नियोजनबध्द पार पडण्यासाठीसर्व विभागांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी संतोष पाटील

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण  मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य सचिवांना समन्स ! ८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही!

vishwatmaklokswamivarta

चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवरनियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा

वाघिणीला नव्हे तर तिच्या शावकाला परतवाडा येथे हलविले; वन विभागाचे स्पष्टीकरण..

भारत टेक्स’च्या धर्तीवर महाराष्ट्र सदनात वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्री; दिल्लीकरांना पारंपरिक वस्त्रांची पर्वणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.