vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

मुंबई पोलिसांच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांची CEIR कारवाई; 100 चोरीचे/हरवलेले मोबाईल हस्तगत, ₹22.70 लाखांचा मुद्देमाल 

मुंबई पोलिसांच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांची CEIR कारवाई; 100 चोरीचे/हरवलेले मोबाईल हस्तगत, ₹22.70 लाखांचा मुद्देमाल

 

मुंबई : प्रतिनिधी –

कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेले व हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी CEIR पोर्टल आणि तांत्रिक तपासाचा वापर करून पोलिसांनी तब्बल 100 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या मोबाईलची अंदाजे किंमत ₹22,70,658 आहे.

CEIR पोर्टलवरील माहिती, IMEI क्रमांक आणि मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींची माहिती यांच्या आधारे मुंबईसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये तपास करण्यात आला. हस्तगत केलेल्या मोबाईलपैकी 18 मोबाईल संबंधित मालकांना परत करण्यात आले असून, उर्वरित मोबाईल परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे

मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांमध्ये राजेंद्र पुरी, खुश साव, कृपा लोढीया, श्रेया साटम, अतुल ससाणे, प्रियांका मिस्त्री, बिनू तमंग, प्रेम गुप्ता, अझिया शेख, श्वेता शहा, संध्या पंडीत, दीपक सातवेकर, सौरभ झांगिड, केतन शेटे, ओंकार राऊत, जियालाल यादव, लक्ष्मी अप्पा कृपागिरी आणि प्रविण दुबे यांचा समावेश आहे.

ही कारवाई डीसीपी उत्तर परिमंडळ-3 गजानन राजमाने, एसीपी दहिसर विभाग जयराज रणवरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

CEIR पोर्टलचे काम पाहणारे पोलीस उपनिरीक्षक मयुर पाटील, मपोशि काजल चौगुले, पोशि अहिरे आणि पोशि बोबडे यांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे ही कामगिरी यशस्वी केली.

00000

 

संबंधित पोस्ट

अवैध व्यवसायांविरुद्ध गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई!

जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रशासनाची कारवाई गौण खनिज, दारू विक्री, वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाई; वाळूसाठा अवैध दारु व मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस व नारायणपूर (छ.ग.) पोलीसांकडून नष्ट

नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्बप्रकरणी1044 वाहनधारकांना साडेचार लाख रुपये दंडाची आकारणी वायुवेग पथकाची वर्षभरातील कारवाई

एका परदेशी दूतावासाच्या बनावट नंबर प्लेट लावलेल्या गाडीतून दिल्लीत फिरत असलेल्या एका महिलेला अटक 

vishwatmaklokswamivarta

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 🚨जलनगर वार्ड परिसरातून मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा साठा जप्त