नवी मुंबई मनपा जिल्हास्तरीय शालेय ‘लॉन टेनिस’ स्पर्धा उत्साहात संपन्न
नवी मुंबई प्रतिनिधी -शालेय विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडा गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या क्रीडा गुणांमध्ये सुधारणा करणे आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणून शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेला अनन्यसाधारण महत्व आहे. याच दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वतंत्र क्रीडा धोरण निश्चित करुन खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे.
या अनुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद,ठाणे यांच्या सहकार्याने आणि नमुंमपा क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय ‘लॉन टेनिस’ क्रीडा स्पर्धा नेरूळ जिमखाना येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धांच्या शुभारंभप्रसंगी क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समिती सभापती श्री. गिरीश म्हात्रे यांनी आवर्जून उपस्थित राहून विद्यार्थी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन समिती सदस्य श्री.धनंजय वनमाळी, जिमखान्याचे खजिनदार श्रीनिवासमुर्ती आणि प्रशिक्षक, शालेय खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतून 14, 17 व 19 वर्षाआतील गटातील मुलांच्या गटात 39 खेळाडू आणि मुलींच्या गटात 28 खेळाडू असे एकुण 67 खेळाडू सहभागी झालेले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खेळाडूंचा सहभाग वाढलेला दिसून आला. विशेषतः लॉन टेनिस हा खेळ जागतिक स्तरावर अत्यंत लोकप्रिय असून यामध्ये सर्वाधिक रक्कमेच्या मानांकित स्पर्धा होत असतात. नवी मुंबईत लॉन टेनिस खेळासाठी आता पोषक वातावरण तयार होत असून शहरातच स्पर्धेचे आयोजन होत असल्याने यामध्ये खेळाडूंचा वाढता सहभाग दिसून येत आहेत.
या स्पर्धेतील मुलांच्या 14 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक – समर समाधान पाटील – फा.ॲग्नल स्कूल वाशी, व्दितीय क्रमांक – श्लोक किशोर – विद्या भवन हायस्कूल नेरुळ, तृतीय क्रमांक- अर्जुन कदम- डॉ.डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कुल नेरुळ, चौथा क्रमांक- समर्थ गोळे – दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ व पाचवा क्रमांक – शंकदिप चौधरी – एपीजे स्कूल, नेरुळ या विद्यार्थ्यांनी पटकाविला.
मुलांच्या 17 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक-पियुष रेड्डी – दिल्ली पब्लिक स्कूल नेरूळ, व्दितीय क्रमांक – अभिनव शर्मा – दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ, तृतीय क्रमांक- ध्येय शांडिल्य – पोद्दार सीबीएससी स्कूल नेरूळ, चतुर्थ क्रमांक – आयुष घाडगे – अमेठी इंटरनॅशनल स्कूल बेलापूर, पाचवा क्रमांक- कैरव पांडे – अमेठी इंटरनॅशनल स्कूल बेलापूर यांनी संपादन केला.
मुलांच्या 19 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक -अथर्व बंगरगी – फादर ॲग्नल स्कूल वाशी, व्दितीय क्रमांक -आरव सोनजे – आर्य गुरुकुल स्कूल ऐरोली, तृतीय क्रमांक- एकांश चावला – दिल्ली पब्लिक स्कूल नेरूळ, चतुर्थ क्रमांक- विवान खन्ना – डॉ.डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरूळ हे मानकरी ठरले.
स्पर्धेत मुलींच्या 14 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक – नियोजिता सिंग – अमेठी इंटरनॅशनल स्कूल बेलापूर, व्दितीय क्रमांक –सुक्रीती – पोद्दार इंटरनॅशनल स्कुल सीबीएसई नेरुळ, तृतीय क्रमांक- हर्षिता बालकृष्णन – ए.पी.जे. स्कुल नेरुळ, चौथा क्रमांक- रेणुका परमेश्वर माशाळे – सेंट झेवियर्स हायस्कूल नेरूळ, पाचवा क्रमांक- अनया गुप्ता – दिल्ली पब्लिक स्कूल नेरूळ विजयी झाले.
मुलींच्या 17 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक- गीत रतिकांत पांडे – एपीजे स्कूल नेरूळ, व्दितीय क्रमांक – तूहीना रॉय – एपीजे स्कूल नेरूळ, तृतीय क्रमांक – शहजीन – लोकमान्य टिळक इंटरनॅशनल स्कूल, चौथा क्रमांक – रिया बासू – डॉ.डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरूळ, पाचवा क्रमांक – हर्षल अग्रवाल – डॉ. डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरूळ यांनी विजेतेपद संपादन केले.
मुलींच्या 19 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक- दिशीका जैन – एपीजे स्कूल नेरूळ व व्दितीय क्रमांक- वगेशा वशिष्ठ – अमेठी इंटरनॅशनल स्कूल बेलापूर यांनी पटकाविला.
स्पर्धा आयोजनासाठी राष्ट्रीय लॉन टेनिस प्रशिक्षक श्री.अवस्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या पाच खेळाडूंना पुढील मुंबई विभागस्तरीय स्पर्धेसाठी महापालिका क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे व उपसभापती श्री.राजु मढवी यांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.0000