vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा निर्मितीत पालकमंत्री नितेश राणे यांचे श्रमदान**जिल्हावासियांना लोकसहभागातून जलसंवर्धनाचे आवाहन*

हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा निर्मितीत पालकमंत्री नितेश राणे यांचे श्रमदान**जिल्हावासियांना लोकसहभागातून जलसंवर्धनाचे आवाहन*

 

सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देत आगामी काळात दुष्काळाचे संकट कोणत्याही पिढीला भेडसावू नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासन चांगल्या प्रकारे काम करीत असून, नागरिकांनीही या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा बांधकामाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी स्वतः श्रमदान करीत बंधारा बांधकामात सहभाग घेतला. जिल्ह्यात लोकसहभागातून १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी कणकवली तालुक्यात २ हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनीही श्रमदानात सहभाग घेतला.

वनराई बंधारे बांधताना कामाची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामसेवक आणि पालकमित्रांनी बंधाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता तपासावी. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी गुणवत्ता तपासणी व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र टीम नेमण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री राणे यांनी यावेळी दिल्या. केवळ बंधारे बांधणे नव्हे, तर त्यांची योग्य पद्धतीने निर्मिती होऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ जलसाठा वाढविण्यासाठी झाला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

जिल्ह्यात प्रथमच निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाचे स्वरूप भीषण आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विविध यंत्रणांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, उपलब्ध पाणीसाठ्याचे संवर्धन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळणे यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज आहे. येणाऱ्या कोणत्याही पिढीला दुष्काळाचे संकट भेडसावू नये, या उद्देशाने ही चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी केले.

*जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संकल्पित केलेली ‘पालकमित्र’ संकल्पना महत्त्वपूर्ण ठरणार*

जलसंधारणाच्या कामांना गावपातळीवर तांत्रिक मार्गदर्शन आणि समन्वय मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संकल्पित केलेली ‘पालकमित्र’ संकल्पना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला

vishwatmaklokswamivarta

भूकंपादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीविषयी जनजागृती कराव-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांचा आढावा• नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन

मीरा-भाईंदरमधील बीएसयूपी लाभार्थ्यांचे पुनर्वसन पीपीपी तत्त्वावर- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नीट युजी 2026 परीक्षा २१ जून रोजी पार पडणार असून, परीक्षा निष्पक्ष, सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात घेण्यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे.

जिल्हयात कृषी विभागा मार्फत कृषी तंत्रज्ञान शेतका-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकाऱ्यांच्या बांधावर

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत! शासनाचा पगार व धर्मांतराचा अड्डा; फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक कधी करणार? – हिंदू संघटनांचा सवाल

vishwatmaklokswamivarta