vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बीड येथील घटना गंभीर; प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

बीड येथील घटना गंभीर; प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

 

राज्य प्रतिनिधी नागपूर, बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घटना गंभीर असून यास सरकारने गांभीर्याने घेतले आहे. संबंधीत आरोपी व दोषी पोलीसांवर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणातील आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 289 अन्वये उपस्थित केलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या घटनेसाठी ‘सीआयडी’ची एक विशेष एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तांत्रिक व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून फरार आरोपींना लवकरच पकडण्यात येईल. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यांस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून एकास निलंबित करण्यात आले आहे. आरोपी कोणत्याही जाती, धर्माचा किंवा राजकीय पक्षाचा असला तरी तसेच कोणत्याही दबावाचा विचार न करता यासंदर्भात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.00

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावेत

♦️२००६ बॉम्बस्फोट प्रकरण : राज्य सरकार सुप्रीम कोर्टात करणार आव्हान.

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थामधील शाळा,विद्यार्थी,पालक व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आयोजित आक्रोश मोर्चा ..

vishwatmaklokswamivarta

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित खेळाडूंची पाहा यादी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा-संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची  डॉक्टरांची माहिती…

vishwatmaklokswamivarta