vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाकरीता मंडळ सदस्य म्हणून नेमणूकीसाठी 10 मे पूर्वी अर्ज सादर करावेत

सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाकरीता मंडळ सदस्य म्हणून नेमणूकीसाठी 10 मे पूर्वी अर्ज सादर करावेत

सांगली, प्रतिनिधी : माथाडी अधिनियमाच्या कलम 6 अन्वये सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ, सांगली या मंडळाकरीता “मंडळ” गठीत करावयाचे आहे. या मंडळावर “मंडळ सदस्य” म्हणून कामगार / मालक प्रतिनिधी यांची नेमणूक करण्याकरीता इच्छुक पात्र व्यक्तींनी दि. 10 मे 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत, असे सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ, सांगली चे अध्यक्ष यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजिवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम 1969 अंतर्गत राज्य शासन निर्मित सांगली जिल्हा माथाडी आणि इतर श्रमजिवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना 1984 व सुधारीत 1992 (कार्यक्षेत्र सांगली जिल्हा) च्या अंमलबजावणीसाठी शासनाने दि. 22 एप्रिल 2025 रोजीचे पत्रान्वये मा. उच्च न्यायालयाच्या दि. 17 एप्रिल 2025 रोजीच्या प्राप्त निर्देशानुसार, तसेच सरकारी अभियोक्ता, मा. उच्च न्यायालय मुंबई या कार्यालयाचे दि. 23 एप्रिल 2025 रोजीच्या पत्रास अधिन राहून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शासनाच्या दि. 22 एप्रिल 2025 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने “मंडळ सदस्य” म्हणून काम करण्याकरीता इच्छुक असलेले तसेच मंडळाचे अनुसुचित उद्योगातील नोंदित व कार्यरत कामगार / कामगार संघटना व मालक यांनी त्यांचे अर्ज / नामनिर्देशन, त्यांचे संपूर्ण नाव, वय, पत्ता व चारित्र्य पडताळणी दाखला तसेच माथाडी क्षेत्रातील कार्य, अनुभव इत्यादी दि. 10 मे 2025 रोजी पर्यंत मंडळास प्लॅाट नं. 94 ए, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या समोर, पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्केट यार्ड, सांगली- 416416 या पत्त्यावर / sanglimathadi@gmail.com या ई-मेलवर सादर करावेत. याबाबत काही साशंकता असल्यास मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिका क्र. 864/2025 इतर 8 सलंग्नित याचिकांमध्ये दि. 17 एप्रिल 2025 रोजी दिलेले आदेश पहावेत. मंडळास प्राप्त झालेल्या अर्ज व शिफारशींमधून योग्य त्या व्यक्तींची निवड करून मंडळ सदस्य पदी नेमणूक करण्याचा अधिकार शासनाकडे राहील, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

उद्योग क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अग्रेसर राहणार- पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचा विश्वास,जिल्हा गुंतवणूक परिषदेत ८६ सामंजस्य करार> ६३१.६७ कोटींची गुंतवणूक> २,९२४ नवीन रोजगार निर्मिती

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी  शेतकऱ्यांच्या वेदना जाणून पारदर्शकपणे गतीने काम करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप, प्रिंटर्सचे वितरण

ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान,जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अभियानाचा लाभ घ्यावा

जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबई, ठळक अक्षरात ‘मराठी नामफलक’राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते  शोरुमचं उद्घाटन झाले

डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्वीकारला बुलढाणा जिल्हाधिकारी पदाचा पदभार