vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हा व्यापारी महासंघातर्फे रक्तदान शिबीर

जिल्हा व्यापारी महासंघातर्फे रक्तदान शिबीर

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी –

जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा व्यापारी महासंघ तसेच गजानन महाराज व्यापारी महासंघ यांच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खीरोळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारोती मस्के, डॉ.महेश लड्डा तसेच व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी स्वामी यांनी रक्तदान, जलपुनर्भरण व वृक्षरोपण करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी, जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष संजय कांकरिया, महाराष्ट्र चेंबर उपाध्यक्ष प्रफुल मालानी, कॅट वरिष्ठ उपाध्यक्ष अजय भाई शहा, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष आदेशपाल सिंग छाबडा, उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी, वरिष्ठ मार्गदर्शक जिल्हा व्यापारी महासंघ सरदार हरी सिंग, पंकज लोया, संतोष कावळे, विकास सावजी, शिवशंकर स्वामी, जयंत देवळानकर, अनंत जयस्वाल, नितीन बारपांडे, अनंत फुलवाडकर, चंदनभाऊ काहीटे, पुनिया, सोनवणे, नामदेव वेताळ, नरेंद्र खोमणे, गंगाधर कोठारी, व अन्य व्यापारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंकर स्वामी व जयंत देवळाणकर यांनी केले.

०००००

संबंधित पोस्ट

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचे हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ एकाच छताखाली लाभ; शिबिराचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

राज्यात ५ हजार ४९७ रुग्णांची नोंद; प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित

अकोले, कोपरगाव, संगमनेर येथील रुग्णालयांचे १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन ; राज्य शासनाची मान्यता,जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

नागपूरमध्ये अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रमांसह ६१५ खाटांचे रुग्णालय

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्हा रुग्णालयाची मोठी कामगिरी! दोन गुंतागुंतीच्या ओव्हेरियन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी!