vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

पोषण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन

पोषण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन

      अमरावती, प्रतिनिधी: कुपोषण आणि अशक्तपणासारख्या समस्या दूर करण्यासाठी, तसेच सर्वांगीण आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात पोषण महिन्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ‘राष्ट्रीय पोषण महिना’ अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभाग आणि इतर संबंधित विभागांच्या सहकार्याने हे उपक्रम राबवले जात आहेत.

  12 सप्टेंबरपासून महिना ‘पोषण महिना’ साजरा केला जाणार आहे. या अभियानाचा उद्देश लहान मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांमध्ये योग्य पोषणाबद्दल जागरूकता वाढवणे आहे. ‘सही पोषण, देश रोशन’ हे घोषवाक्य घेऊन हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत अंगणवाड्या, शाळा आणि ग्रामीण भागांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, पोषण आहाराचे महत्त्व सांगणारे प्रदर्शन, तसेच पौष्टिक पाककृतींचे प्रात्यक्षिक आयोजित केले जाणार आहे.

 या अभियानाच्या माध्यमातून केवळ पोषणविषयक समस्यांवरच नव्हे, तर स्वच्छता, लसीकरण आणि आरोग्यदायी सवयींवरही भर दिला जात आहे. तसेच लठ्ठपणा नियंत्रणात साखर आणि तेलाचे सेवन कमी करणे, प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षण, पोषण भी – पढाई भी, एक पेड माँ के नाम, बाल व लहान मुलांच्या आहार पद्धती, मेन स्ट्रीमींग, व्होकल फॉर लोकल आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून निरोगी जीवनासाठी योग्य आहाराची निवड करण्याचे महत्त्व सांगितले जाणार आहे.

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन मुलांना आणि महिलांना संतुलित आहाराबद्दल माहिती देतील. या उपक्रमांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, बचत गट आणि महिला मंडळेही सक्रियपणे सहभागी होतील. यासाठी जिल्हा परिषेदेने महिन्याभरात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे, त्यानुसार उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी कळविले आहे.00000

संबंधित पोस्ट

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४३० कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी· सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ,पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक विभागीय आयुक्तांकडून वृक्ष लागवड

प्रासंगिक लेख / आंबेडकर जयंती / 14 एप्रिल 2026  बाबासाहेबांचे संविधान म्हणजे…एकसंघ भारताची पोलादी चौकट… 

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन

पालक सचिव यांनी घेतला विकास कामाचा आढावा· पालक सचिव पराग जैन यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta