vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*

*साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*

 

*साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील मंदिर जीर्णोद्धार, समाधी स्थळ संवर्धन, घाट परिसर विकासाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा*अजिंक्यतारा किल्ल्यातील राजसदर, बुरुज, तटबंदीच्या दुरुस्ती कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा*

       मुंबई द प्रतिनिधी: – साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई, पहिले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचे जतन आणि संवर्धन, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण, संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या स्थळांच्या परिसराचा पुनर्विकास करताना तेथील परिसर, समाधी स्थळ, प्राचीन वास्तूंचं मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत संगम माहुली, सातारा येथे महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई आणि पहिले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे संवर्धन, जिर्णोद्धार आणि जमीन विकसित करणे, साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला सुशोभीकरण,मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक या स्थळांच्या परिसर विकासाबाबत आढावा घेण्यात आला.

     या सर्व ऐतिहासिक स्थळांचा पुनर्विकास करताना पुढील शंभर वर्षे टिकेल अशी वास्तू उभारावी.त्या ठिकाणी पुरेसे वृक्षारोपण करावे, स्वच्छता राखावी, पर्यटन आणि व्यावसायिक दृष्टिकोनही ठेवावा, भविष्यातील देखभाल – दुरुस्ती बाबतही आतापासूनच उपाययोजना करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.संगमेश्वर येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातही या बैठकीत आढावा घेण्यात आला आणि आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

    यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता,नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसचिव नंदा राऊत,पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे हे मंत्रालयातून तर पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे उपस्थित होते.

  000000

संबंधित पोस्ट

करवीर हायकर्स’ च्या सातजणांची तिरंगा फडकवून,संविधान उद्देशिका प्रदर्शनाने एवरेस्ट बेस कँप’ यशस्वी… 

vishwatmaklokswamivarta

कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महोत्सव – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई शेती, संस्कृती आणि ग्रामीण पर्यटनाचा दि. १५ ते १७ एप्रिल २०२५ रोजी भव्य सोहळा

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..

बदलापूर येथे दि.18 फेब्रुवारी रोजी’नक्शा’ प्रकल्पाचा होणार शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील वाळू घाटांचा प्रारूप जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल जाहीरØ एमआरसॅकमार्फत सर्वेक्षणØ अभिप्राय, सूचना अथवा निवेदन सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शबरी नॅचरल्स’चा डंका आता दिल्लीपर्यंत; केंद्रीय जनजातीय संचालक डॉ. वर्नाली डेका यांच्याकडून कौतुकाची थाप