vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

गर्भाशयमुख कर्करोगावरील लसीकरणासाठी सिरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गर्भाशयमुख कर्करोगावरील लसीकरणासाठी सिरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

पुणे, प्रतिनिधी गर्भाशयमुख कर्करोगावर लसीद्वारे प्रतिबंध घडवून आणण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.

हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे भेट देऊन संस्थेतील चालू संशोधन, लसनिर्मिती प्रक्रिया आणि भविष्यातील प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि गर्भाशयमुख कर्करोगावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्याच्या उपक्रमाविषयी माहिती घेतली.आबिटकर म्हणाले, “गर्भाशयमुख कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाबरोबरच जनजागृती, वेळेत निदान आणि उपचार हेही तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. राज्यात महिलांमध्ये गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आणि तपासणी मोहिमा आयोजित करणे अत्यावश्यक असल्याचेही श्री. आबिटकर यांनी सांगितले.

डॉ. पूनावाला म्हणाले, “गर्भाशयमुख कर्करोग हे महिलांमध्ये आढळणारे प्रमुख आरोग्य आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ‘एचपीव्हीलस विकसित करण्याचे काम करत आहे.

श्री. आबिटकर सिरम इन्स्टिट्यूटच्या भेटीदरम्यान संस्थेचे संशोधन विभाग, लसनिर्मिती युनिट आणि प्रयोगशाळा यांचीही यांनी पाहणी केली. यावेळी डॉ. सायरस पूनावाला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न

कुंभमेळ्याच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्वाचा – मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

पेण तालुक्यातील खारेपाट येथीलपाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार- मंत्री गुलाबराव पाटील

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती : अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

vishwatmaklokswamivarta

आता स्वयंचलित दरवाज्यांसह मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित

मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी,गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंजुरी..