vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण

सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना भरती पूर्व तयारी करण्यासाठी छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि. 15 ते 24 डिसेंबर या कालावधीत SSB कोर्स क्र. 64 आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात येते

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे दि.10 डिसेंबर रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB – 64 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट काढून व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेऊन यावेत.

कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CBSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरेने एस एस बी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी.मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एस एस बी कॉल लेटर असावे किंवा एस एस बी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी-अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई मेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. आणि 0253-2451032 व व्हाटसएप क्र. 9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा-शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श घेऊन शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावीसाठी कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे..

विकसित भारतासाठी कौशल्यसंपन्न मानव संसाधनाची निर्मिती हीच काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले पहिले उद्यान अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन-विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वंदे मातरम्‌’ उद्यानाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात 21 ते 24 मे 2025 दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई

vishwatmaklokswamivarta

01 ऑक्टोंबर, 2026 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम जाहीर