vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गडचिरोलीच्या श्वेता कोवेच्या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन एशियन युथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण व कांस्य पदक,श्वेताचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद..

गडचिरोलीच्या श्वेता कोवेच्या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन एशियन युथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण व कांस्य पदक,श्वेताचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद..

गडचिरोली प्रतिनिधी: दुबई येथे पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी तथा दिव्यांग खेळाडू कु. श्वेता कोवे हिने पॅरा आर्चरी स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदकांची कमाई करत देशाचे आणि जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ (ट्विटर) या समाज माध्यमावरून तिचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या संदेशात श्वेता कोवेच्या जिद्दीला, परिश्रमांना आणि आत्मविश्वासाला सलाम करत तिचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले आहे. दुर्गम भागातून आलेल्या एका तरुणीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चमकदार कामगिरी करत पदके पटकावणे हे अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

श्वेताच्या वडिलांच्या निधनानंतर आईने मोलमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत तिला सातत्याने प्रोत्साहन दिले. आईच्या पाठबळावर आणि स्वतःच्या अथक मेहनतीवर विश्वास ठेवत श्वेताने जीवनातील अनेक अडचणींवर मात केली. एशियन युथ पॅरा गेम्समध्ये तब्बल १४ देशांच्या खेळाडूंशी स्पर्धा करत तिने सुवर्ण व कांस्य पदक पटकावले.

भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या श्वेता कोवेच्या या यशामुळे दुर्गम व आदिवासी भागातील असंख्य मुला-मुलींना नवी दिशा, आशा आणि आत्मविश्वास मिळाला असून तिची ही कामगिरी युवा पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले आहे.

संबंधित पोस्ट

महिंद्रा अँड महिंद्रा येथे इंटर्नशिप कॅम्प; ५१० जागांसाठी २० मे रोजी मुलाखती

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अखंड ऊर्जेचा स्रोत – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

मतदान केंद्राजवळचे आठवडी बाजार 7 फेब्रुवारी रोजी बंद – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

वेबसाईट बंद असल्याने नवीन, जुने रेशनकार्ड मिळत नसल्याने-काँग्रेस माथाडी कामगार चे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांना एका निवादानाद्वारे सुरू करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या* *सभापदी पदांची निवड संपन्न*