vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

हिंद-दी-चादर’ शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त 10 ते 25 फेब्रुवारी कालावधीतनवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विशेष आरोग्य ‍शिबीरांचे आयोजन 

‘हिंद-दी-चादर’ शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त 10 ते 25 फेब्रुवारी कालावधीतनवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विशेष आरोग्य ‍शिबीरांचे आयोजन

आरोग्य प्रतिनिधी-

          महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त अत्यंत भव्य स्वरुपातील कार्यक्रम दि.28 ते 01 मार्च 2026 या कालावधीत सेक्टर 29 खारघर येथील ओवे मैदानात सकाळी 8.00 ते रात्री 10.00 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. श्री गुरु तेगबहादूर साहिब यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहित व्हावा यादृष्टीने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. श्री गुरु तेगबहादूर साहिब यांचा प्रेरणादायी वारसा जपत त्याला आधुनिक भारताच्या सुशासनाची जोड देत प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रित येऊन ‘हिंद-दी-चादर’ हा कार्यक्रम राबविला जात आहे.

          या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर श्रीम.सुजाता पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत तसेच जगभरातून येणा-या नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची पूर्तता करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने समन्वयक अधिकारी असणार असून संबंधित विभागप्रमुखांकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

          या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंबांच्या, समाजाच्या तसेच संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी केंद्रस्थानी आहे हे लक्षात घेत दि.१० फेब्रुवारी, ते २५ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे.

   या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्यामार्फत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 25 फेब्रुवारी पर्यंत 124 शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठीची तपासणी करणे. तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या तोंडाच्या कर्करोग निदानासाठीची तपासणी करणे, माता व बाल आरोग्य आणि लसीकरण, क्षयरोग होण्याची अतिजोखीम असलेल्या महिलांची क्षयरोग निदानासाठीची तपासणी करणे. सिकलसेल रोग (SCD) तपासणी करणेआदी तपासण्या करण्यात येत आहेत. याकरिता अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, कान नाक व घसा रोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक अशा तज्ज्ञांच्या सेवा दिल्या जात आहेत

      ‘हिंद-दी-चादर’ उपक्रमाच्या अनुषंगाने आज १० फेब्रुवारी, २०२६ रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी व नेरुळ रुग्णालयात तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशी आणि नेरूळ 2 या ठिकाणी विशेष आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांना नागरिकांचा, विशेषत्वाने महिलांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद लाभला. अशा प्रकारे ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमानिमित्त महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये व नागरी आरेाग्य केंद्रांमध्ये 25 फेब्रुवारी पर्यंत दररोज आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबीरांचा लाभ नवी मुंबईकर नागरिकांनी मोठया संख्येने घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

कंत्राटी स्वरुपात मानसोपचार तज्ञ पदाकरिता इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप-निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार

vishwatmaklokswamivarta

सर्व पशुवैद्यकीय चिकित्सालये, तालुका व जिल्हा चिकित्सालये तसेच फिरते दवाखान्यांच्या कामकाजाच्या वेळा निश्चित

जन आरोग्य योजना सर्वांसाठीच ठरणार जीवनदायी

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम — दि. १२ ऑक्टोबर २०२५“दोन थेंब आयुष्याचे – प्रत्येक बालकासाठी सुरक्षित भविष्याचे”..

डॉक्टर व कर्मचारी यांना निवास सुविधा देण्यासाठी कालबद्ध आराखडा- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर