vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमस्थळी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी…

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमस्थळी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी…

 

    नवी मुंबई प्रतिनिधी-  दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी ओवे मैदान से.29 खारघर येथे होणा-या ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाला देशापरदेशातून 18 ते 20 लाख नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेउुन महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोकण विभागीय आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली सुयोग्य व्यवस्था करण्यात येत आहे. हा कार्यक्रम पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये संपन्न होत असला तरी शेजारील महानगरपालिका म्हणून नवी मुंबई आयोजन कार्यात संपूर्ण सहकार्याच्या भावनेतून सक्षमतेने सहभागी आहे.

          नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत कार्यक्रम आयोजन विषयक सर्व बाबींकडे विशेष लक्ष दिले जात असून आज संबधित आधिका-यांसह प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळाला भेट देत त्यांनी संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री. मंगेश चितळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. तुषार दौंडकर आणि नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी तसेच रायगड उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा “हिंद दी चादर”चे समन्वयक श्री.रविंद्र राठोड व श्री. हॅप्पीसिंग उपस्थित होते.

          याप्रसंगी मुख्य व्यासपिठाची पाहणी करण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय व्यवस्था, लंगर व्यवस्था, अन्न धान्य व साहित्य भांडार व्यवस्था, बैठक व्यवस्था, वाहन पार्कींग व्यवस्था, हेलीपॅड व्यवस्था अशा विविध बाबींची पाहणी करण्यात आली. त्यासोबतच वैद्यकीय व्यवस्थेची पाहणी करतांना त्याठिकाणी आयसीयू, कार्डिअेक ॲम्ब्युलेंस, प्रथमोपचार व औषध व्यवस्था याबाबत विशेष दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले. वातावरणातील उष्मा लक्षात घेउुन पिण्याचे पाणी, ओआरएस, ज्यूस आदींची जास्तीत जास्त व्यवस्था करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. त्याचप्रमाणे परिसर स्वच्छता व शौचालय स्वच्छता सुव्यवस्थीत राहण्याकडे काटेकोर लक्ष देण्याचे सुचित करण्यात आले.

लंगर व्यवस्थेजवळ आजपासूनच अग्निशमन वाहने उपलब्ध्‍ करुन देण्याचे सूचित करण्यात आले. या कार्यक्रमास मोठया संख्येने नागरिक ठिकठिकाणाहून येणार असल्याने वाहतूकीचे नियोजन सुव्यवस्थीत रितीने करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत असून कोणत्या गाड्या कुठे पार्क होणार या विषयीच्या माहितीसाठी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने ॲप तयार करण्यात येत असून त्याचा जास्तीत जास्त्‍ प्रसार करावा अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.

            नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्रमासाठी आवश्यक निवास व्यवस्था, पाणी पुरवठा, अग्निशमन दल, शौचालय व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, प्रवासी वाहतूक व्यवस्था, दैनंदिन स्वच्छता अशा सर्वच बाबींमध्ये मदत कार्यात पुढे आहे. त्यासोबतच नवी मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालये, संस्था संघटना यांच्यामार्फत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रात डिजीटल व फ्लेक्स होर्डिंग, बसेस व बस स्टॉप येथील होर्डिंग, सिनेमागृहात भक्तीगीत प्रसारण, शाळा महाविद्यालये या ठिकाणी माहितीपट प्रसारण, सर्व सोशल माध्यमातून कार्यक्रमाच्या माहितीचा प्रसार अशा विविध प्रकारे कार्यक्रमा विषयीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी 10 फेब्रुवारी पासून व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. या अनुषंगाने शाळा महाविद्यालयांमधून प्रभात फे-यांचे आयोजन, निबंध चित्रकला वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.

            हा कार्यक्रम सुव्यवस्थीत रितीने संपन्न व्हावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध बाबींकरिता नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार हे कार्यक्रमासाठीचे मुख्य समन्वय अधिकारी म्हणून सर्व बाबींवर बारकाईने लक्ष देत आहेत.

           या अनुषंगाने आज सायं. 4 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबईतील सातही गुरुव्दारांच्या संयुक्त सुप्रिम कौन्सिल ऑफ गुरुव्दारा यांच्या सहयोगाने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५’ ला मान्यता दिली.संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक, 2025 मंजूर..

vishwatmaklokswamivarta

जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 7 मार्च पर्यंत वाढविली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली चतुरस्त्र अभिनेता, कला क्षेत्रातील मार्गदर्शक दुवा

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्ह्यातील २५ टन फळे, भाजीपाला विशेष वॅगनने दिल्लीला रवाना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि व रेल्वे विभागाचे केले अभिनंदन! – सांगली पॅटर्न – एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण !!

vishwatmaklokswamivarta

विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान समजून घेण्याचे आवाहन – केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta