vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

मोहरम सुटीमुळे 26 जूनचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द

मोहरम सुटीमुळे 26 जूनचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द

बुलढाणा, प्रतिनिधी जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे प्रत्येक शुक्रवारी नियमितपणे नेत्र, मतिमंद/मनोरुग्ण तसेच कान-नाक-घसा (ईएनटी) संबंधित दिव्यांग तपासणी व दिव्यांग बोर्डाचे कामकाज आयोजित करण्यात येते.

मात्र, येत्या 26 जून 2026 (चौथा शुक्रवार) रोजी मोहरम निमित्त शासकीय सुटी असल्याने त्या दिवशी आयोजित करण्यात आलेले नेत्र, मतिमंद/मनोरुग्ण व कान-नाक-घसा संबंधित दिव्यांग तपासणी शिबिर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित दिव्यांग तपासणीसाठी 26 जून रोजी जिल्हा रुग्णालयात येऊ नये. शिबिर रद्द असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा.

तसेच, शिबिर रद्द असल्याची माहिती असूनही कोणी रुग्णालयात आल्यास होणाऱ्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सुचना जारी..

३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

आरोग्य – सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने आरोग्य सेवा तळागाळात पोहोचणार – डॉ. स्वानंद सोनारजिल्ह्यातील ६८ स्वयंसेवी संस्था, रुग्णालय प्रतिनिधींची बैठकनिरामय अहिल्यानगर अभियान’वर सविस्तर चर्चा

हिवताप / डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबईत सर्व विभागांमध्ये जनजागृती शिबीरे

मानसिक आरोग्य आढावा मंडळावरअशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश..

बुलढाण्यात कॅन्सर व्हॅन जनजागृती व मोफत तपासणी मोहिमेचा शुभारंभ