vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे

अमरावती, प्रतिनिधी : सामान्य प्रशासन विभागाच्या 30 एप्रिल 2026 च्या अधिसूचनेनुसार अरुण किशोर डोंगरे यांची अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी श्री. डोंगरे यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.

नवीन प्रशासन भवन, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात झालेल्या शपथग्रहण सोहळ्यामध्ये माजी आयुक्त दिलीप शिंदे यांनी नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल नवनियुक्त आयुक्त अरुण डोंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले

या शपथविधी सोहळ्याला विधानसभा सदस्य करण देवतळे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, कोकण विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंह, पुणे विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी ही काळाची गरज – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद- 460 हून अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड- 30 नामांकित कंपन्यांचा सहभाग; 813 रिक्त पदांसाठी 2000 पेक्षा अधिक उमेदवारांची उपस्थिती

कोलकाता पोलीस उपायुक्त शंतनू सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी; ईडीची मोठी कारवाई 🇮🇳⚖️🔍 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील १८ हजार १२४ मतांनी विजयीडॉ. प्रतापसिंह पाटील यांना ८५ हजार ८७६, तर सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते३९ उमेदवारांच्या वगळणीनंतर अंतिम निकाल जाहीर ; विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराला गाठता आला नाहीनिवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी विजयाचे प्रमाणपत्र प्रदानसलग ४५ तासांहून अधिक काळ मतमोजणी ; अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून प्रक्रिया पूर्ण

vishwatmaklokswamivarta

महिला आर्थिक सक्षमीकरणास प्राधान्य;‘उमेद’मुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी अवजार बँक, कृषी निविष्ठा केंद्रांसह महिलांच्या हातात शेतीची यंत्रे

धारावीत ज्येष्ठ नागरिकांसाठी छळवाद प्रतिबंध माहिती सत्र संपन्न*