vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी आयुष्मान व वयो वंदना कार्ड आवश्यक

आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी आयुष्मान व वयो वंदना कार्ड आवश्यक

आरोग्य प्रतिनिधी -बुलढाणा, : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वयो वंदना कार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी पात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान व वयो वंदना कार्ड तयार करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांना लाभ मिळणार असून योजनेंतर्गत 2 हजार 399 विविध आजारांवर मोफत उपचार उपलब्ध आहेत. 70 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी वयो वंदना कार्ड तयार करण्यात येत आहे. हे कार्ड तयार करण्यासाठी beneficiary.nha.gov.in या पोर्टलवर जाऊन “For Senior Citizens of the age of seventy years and above CLICK HERE TO ENROLL” या लिंकवरून नोंदणी करून कार्ड तयार करता येते.

वयो वंदना कार्डसाठी आवश्यक बाबी : नागरिकाचे वय 70 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे, आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक.आयुष्मान कार्डसाठी आवश्यक बाबी : अद्यावत शिधापत्रिका व 12 अंकी शिधापत्रिका क्रमांक, आधार कार्ड व आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक.

नागरिकांना सीएससी, आपले सरकार सेवा केंद्र, आशा स्वयंसेविका तसेच रेशन दुकानदार यांच्यामार्फत आयुष्मान व वयो वंदना कार्ड तयार करून घेता येणार आहे. पात्र नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

00000

संबंधित पोस्ट

एचआयव्ही बाधीत औषधोपचारांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता- जिल्हाधिकारी संतोष पाटील

वैद्यकीय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीत नवे बदल आवश्यक पल्स 2026 मधील चर्चासत्रात भर

आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी**औषधसाठा, रुग्णांचा आहार आणि आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबत सूचना*

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना ‘राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन’ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न▪️सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष मोहीम सुरू

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे ‘मच्छर ला टक्कर’ अभियानाची सुरुवात कीटकजन्य आजारांविरोधात भव्य जनजागृती चित्ररथ मोहीम

vishwatmaklokswamivarta

🏥📊 आरोग्य कार्यक्रम अंमलबजवनी निर्देशकामध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी