vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे नियोजन प्राधान्याने करा – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे नियोजन प्राधान्याने करा – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी : सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात बैठक झाली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत व डॉ. सरिता हजारे उपस्थित होते. तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नियुक्त सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, (से.नि. महासंचालक, आरोग्य सेवा) आणि डॉ. मोहन जाधव, (से.नि. संचालक आरोग्य सेवा) यांनी यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा मुद्दा अधोरेखित केला. आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा स्तरावरील आरोग्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी प्रभावी काम करावे, यासाठी त्यांनी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करावे. आपले प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था इतक्या प्रभावी सर्वसमावेशक असाव्यात की परराज्यांतील कर्मचाऱ्यांनीही या ठिकाणी प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करावी.

तालुका आरोग्य अधिकारीपदास प्राधान्याने बळकटी देण्यावर भर देण्यात येत असून तालुका आरोग्य अधिकारी हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत महत्वाचा असुन, प्रशिक्षण कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी (टीएचओ) आणि समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांचा आवर्जून समावेश करावा. पद संवर्गनिहाय प्रशिक्षणाचा सविस्तर आराखडा तयार करुन एक महिन्याच्या आत मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

०००

संबंधित पोस्ट

#यशवंतराव_चव्हाण_द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद..मुंबई पुणे एक्सप्रेस वे तीन तासाचा दोन दिवस ब्लॉग असणार आहे याकरता पर्यायी मार्ग जाणून घ्यावे

इतर मागास बहुजन कल्याण विभागात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत काटकसरीने नियोजन पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी वापरात किमान १० टक्के कपातीचे निर्देश

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-मतदारांना ओळख पटविण्यासाठी १० पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

vishwatmaklokswamivarta

रेशीम उत्पादनाच्या ‘जालनाई ब्रँड ‘चा जालन्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभसिल्क, सीड आणि स्टीलची सिटी म्हणून आता जालना जिल्हा ओळखला जाणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जालन्यातील रेशीम बाजारपेठेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शानदार उदघाटन

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक कलागुणांसाठी ‘आपलं मंत्रालय’ सशक्त व्यासपीठ – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह ‘आपलं मंत्रालय’च्या काव्यसंध्येने दीपोत्सवात फुलला शब्दांचा आनंदोत्सव

vishwatmaklokswamivarta