vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी होणार मान्यवरांच्या हस्ते गौरव

जिल्हा युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी होणार मान्यवरांच्या हस्ते गौरव

अमरावती, प्रतिनिधी: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील युवक, युवती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे सन 2024-25 व 2025-26 चे ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, अमरावती येथील प्रांगणात आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते आणि वरिष्ठ सनदी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा वितरण सोहळा पार पडणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

सन 2024-25 या वर्षासाठी ‘विशेष जिल्हा युवा पुरस्कार’ नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास गणेश पोकळे याला जाहीर झाला आहे. श्रीनिवासने आपल्या अभिनयाने दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. याच वर्षासाठी युवक गटातून अमर पुरुषोत्तम वानखडे (तिवसा), युवती गटातून कु. जानव्ही राउत (नया वाठोडा) तसेच संस्था गटातून श्री. संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था (गुरुकुंज आश्रम) यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार, व्यसनमुक्ती, रक्तदान आणि आदिवासी विकास क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे

सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाजप्रबोधनकार वेदांत मुंदाने (अमरावती), युवती गटात कु. पुजा गुंजरकर (ब्राम्हणवाडा थडी) आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचार मंच (अचलपूर) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. वेदांत मुंदाने यांनी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले आहे, तर पुजा गुंजरकर यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात योगदान दिले आहे. अचलपूरच्या विवेकानंद विचार मंचने आरोग्य सेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले आहे. युवक व युवती पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 10 हजार रुपये रोख, तर संस्था पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 50 हजार रुपये रोख असे आहे.

00000000

संबंधित पोस्ट

गावदेवी भाजी मंडई परिसरातील परिस्थ‍िती नियंत्रणात

विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत चांदूर बिस्वा येथे आरोग्य शिबिर-विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार आणि आरोग्यदायी सवयींबाबत मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना 📢

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी

कोकणा सह  मध्य महाराष्ट्रात मुंबई उपनगरात आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज..

vishwatmaklokswamivarta

जनगणना प्रक्रियेत प्रत्येक अधिकारी- कर्मच्याऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी-जिल्हाधिकारी राहुल कर्डीले जनगणना २०२७ प्रशिक्षण कार्यशाळेस सुरुवात; नागरिकांना स्व-गणनेची सुविधा