vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्या

नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’धक्कादायक;अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’धक्कादायक;अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

            मुंबई, प्रतिनिधी:- भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्याआड गेला आहे. नटसम्राट नानांची अशी आकस्मिक एक्झिट धक्कादायक आहे, अशी शोकमग्न भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी घेतलेली भूमिका कलाक्षेत्रासह, अनेकांना सामाजिक बांधिलकीचा धडा घालून देणारी ठरली आहे. त्यांच्या निधनामुळे कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

            शोकसंदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, स्नेही, मित्र म्हणून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे घट्ट ऋणानुबंध राहीले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीला नानांच्या रुपाने मराठी मातीतील रांगडा, पण तितकाच संवेदनशील असा अभिनेता मिळाला. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.

     नाना जिथे जात तिथे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, स्वभावाचा भारदस्तपणा वातावरण भारून टाकत. नानांचे अस्तित्त्व त्या परिसराला व्यापून टाकत असे. नाना सर्वांशीच हक्काने आणि वडिलकीच्या, मार्गदर्शकाच्या नात्यानं बोलत असत. त्यामध्ये आत-बाहेर असा भाव नसे. त्यामुळे त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधता येत असे.

     परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले. शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पाटेकर कुटुंबियांच्या, नानांच्या चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

००००

संबंधित पोस्ट

चक्रधर स्वामींच्या विचारांतून सशक्त समाज आणि राष्ट्राची निर्मिती – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

दुष्काळजन्य परिस्थितीत नुकसानग्रस्त सर्व २६ हजार ५६५.७८ हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण अहवाल शासनाकडे सादर; सत्यापन प्रक्रियेची कार्यवाही सुरू

vishwatmaklokswamivarta

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून  -निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..🌳 जिल्ह्यातील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मावळातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू; ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी (दि. ९)