vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास शासनाची मान्यता- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास शासनाची मान्यता- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, प्रतिनिधी : “दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण अशा देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. देशी गायींच्या मौल्यवान व दुर्मिळ प्रजातींचे जतन, त्यांची दुग्धक्षमता वाढवणे तसेच शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे या महत्वाच्या बाबींवर या केंद्रामार्फत कार्य सुरू आहे. त्यांच्या पश्चात या केंद्रास त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची व स्मृतीची जपणूक करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रास अजितदादा पवार यांचे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय (क्र. 202605131138212501) कृषी विभागाने जारी केला आहे.

देशी गायींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, सुधारणा आणि संशोधन करण्याच्या उद्देशाने पुणे येथील कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. या केंद्राच्या बळकटीकरणालाही यापूर्वी शासनाने मान्यता दिली होती.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्या १२२ व्या बैठकीत या केंद्राला “अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र” असे नाव देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “देशी गायींचे संवर्धन, संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य शासन सक्षमपणे काम करत आहे. पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात आल्याने या कार्याला आणखी नवी ओळख आणि बळ मिळेल.

 

संबंधित पोस्ट

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

वादग्रस्त भोंदूबाबा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा.

सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी प्रमाणित बियाणे वाटपासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

रायगड जिल्ह्यात 385 रुग्णांना सुमारे 3.35 कोटींची मदत**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती*

बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ ‘सांगता सभा’प्रचाराचा शेवटचा दिवस. 

शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी स्व-गणना करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल