vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे.

मुंबई, प्रतिनिधी : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी मंत्रालयात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित केलेला एकदिवसीय लाक्षणिक संप तसेच आझाद मैदानावर काढण्यात येणारा मोर्चा मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत दि. २ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर निदर्शनाबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आज मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर संघटनेने दि. ६ ऑक्टोबर रोजीचा प्रस्तावित संप व मोर्चा मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

००००

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे

जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेत सन २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयांमधील तपासणी व उपचार हे नि:शुल्क..

vishwatmaklokswamivarta

आत्ताची मोठी बातमी -ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी….

vishwatmaklokswamivarta

लोकायुक्त संस्थेच्या चार सदस्यांचा शपथविधी संपन्न· राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ…

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन