vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यपालांच्या हस्ते ब्रेल दिवाळी अंकाचे प्रकाशन अंध उद्योजकांना स्वयंरोजगारासाठी मदत जाहीर

राज्यपालांच्या हस्ते ब्रेल दिवाळी अंकाचे प्रकाशन अंध उद्योजकांना स्वयंरोजगारासाठी मदत जाहीर

मुंबई, प्रतिनिधी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘वंदे मातरम’ ब्रेल संस्कार भारती दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकभवन येथे झाले. कार्यक्रमाचे आयोजन ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन, नाशिक या संस्थेने लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रन संस्थेच्या सहकार्याने केले.

संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या ब्रेल पुस्तक प्रकाशन योजना, शिष्यवृत्ती योजना, स्वयंरोजगारासाठी मदत या कार्याचे राज्यपालांनी कौतुक केले. संस्थेतर्फे पुरस्कृत दहा दृष्टिहीन व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत करण्याचे राज्यपालांनी या प्रसंगी जाहीर केले. कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड, दादर येथील विद्यार्थिनींनी यावेळी सरस्वती वंदना सादर केली. सुरेल सादरीकरणाबद्दल राज्यपालांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. यावेळी महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या डिझायनर निशा सासमल यांनी वंदे मातरम गीताला १५१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यपालांना १५१ दिवे भेट दिले.ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. सदर ब्रेल दिवाळी विशेषांकात कला, क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, आरोग्य आदी विषयांवरील लेख समाविष्ट केले असून सदर पुस्तक राज्यातील सर्व अंध विद्यार्थ्यांच्या शाळा व कार्यशाळांना मोफत दिल्या जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमासाठी कॅप्टन पर्सी मास्टर, मास्टर मरीन सर्व्हिसेस लिमिटेड व पियुष जसरानी, हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्ट यांनी अर्थसहाय्य केले आहे.कार्यक्रमाला लायन्स इंटनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पवन अगरवाल, लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रनचे अध्यक्ष जितेंद्र सकपाळ, प्रकल्प समन्वयक लायन विजय रायमाने, अपार इंडस्ट्रीजचे संचालक नुपूर देसाई, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे आदी उपस्थित होते.

 

0000

 

संबंधित पोस्ट

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र अनिवार्य;लाभार्थ्यांसाठी 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

गडचिरोलीतून 100 कोटींच्या निर्यातीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा**महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेन्शन 2026 एक दिवसीय परिषद संपन्न*

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,बदनापूर येथे प्रवेशासाठी 20 जुन 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शिक्षिकेची मरणोत्तर सामाजिक बांधिलकी- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाखांची देणगी

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश

vishwatmaklokswamivarta