vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत  मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी 26 बालके मुंबईला रवाना

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत  मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी 26 बालके मुंबईला रवाना

 

 सांगली, प्रतिनिधी : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील 26 बालके मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना झाली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या प्रयत्नांनी आयोजित तपासणी शिबिरात निदान झालेली ही बालके आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, महिला व बालकल्याण सभापती स्नेहल मोरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती सावित्री रवीपाटील, जिल्हा परिषद सदस्य विकास हाके यांनी या प्रसंगी उपस्थित राहून लाभार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या.

 सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात मोफत 2 डी इको तपासणी शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या 208 बालकांपैकी ओपन हार्ट शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या या 26 बालकांना मुंबई येथील बालाजी हॉस्पिटल, एसआरसीसी हॉस्पिटल व कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल येथे पुढील शस्त्रक्रियेसाठी सिव्हिल हॉस्पिटल आवार, सांगली येथून रवाना करण्यात आले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी बालक व पालकांना यशस्वी व मोफत शस्त्रक्रियेची ग्वाही दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी कार्यक्रमाची व आजअखेर पूर्ण करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांची माहिती दिली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबविला जात असून या कार्यक्रमाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता व परिचारिका यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रम राज्यात नेहमीच अग्रस्थानी राहत असल्याचे सांगण्यात आले.

शस्त्रक्रियेस पात्र लाभार्थ्यांना मोफत प्रवास, निवास व भोजन व्यवस्थेसह मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. सर्व शस्त्रक्रिया या गुंतागुंतीच्या व अतिखर्चिक आहेत. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय संस्था व खाजगी रक्कम देणगी आदी माध्यमांतून अनुदान उपलब्ध करून शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

 सन 2026-27 मध्ये माहे सप्टेंबर 2026 अखेर एकूण 27 लाभार्थ्यांवर अशाच प्रकारच्या गुंतागुंतीच्या हृदयशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. तसेच 480 लाभार्थ्यांवर इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. सन 2012 पासून आजअखेर 1952 लाभार्थ्यांवर हृदयशस्त्रक्रिया व 25477 लाभार्थ्यांवर इतर शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत.

 निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस, रोहित चौगुले, सत्यजीत वडेर, अनिरुद्ध लोंढे व इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी शिबिराचे नियोजन केले.

000000

संबंधित पोस्ट

जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अ त्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी ‘मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर’वर यशस्वी उपचार;

vishwatmaklokswamivarta

राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महाडायलिसीस’ योजना

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रात्रकालीन रक्त संकलन मोहीम 

vishwatmaklokswamivarta

तालुका : खुलताबादसेवा संकल्प अभियानांतर्गत डोंगरगाव शिव येथे आरोग्य शिबिर

vishwatmaklokswamivarta

जागतिक हिवताप दिनी नवी मुंबईत जनजागृती शिबिरांचे आयोजन  

प्राथमिक आरोग्य केंद्र बाबरा येथे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची आकस्मिक भेट,आरोग्य सेवांचा आढावा; गुणवत्तापूर्ण व वेळेत सेवा देण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta