vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

वरवंड येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

वरवंड येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

बुलढाणा, प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत ‘कस काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, वरवंड येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यशाळेत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक, सुलभ व लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, तसेच ‘अधिक उपचार, कमी रेफरल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे, हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. संतोष साबळे, डॉ. सचिन खेडेकर, कमल पदमने, सागर जाधव, प्रवीण मुंढे, सुवर्णा बेलसरे, सुनीता जंवजाळ व सुलोचना पऱ्हाड यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत माता व बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, वृद्धांची आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आयुष उपचार पद्धती, आरोग्य शिक्षण व जनजागृती, समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन तसेच ‘कस काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी यांसह विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.

गर्भवती व प्रसूतीपश्चात मातांची काळजी, नवजात व बाल आरोग्य, आजारांचे लवकर निदान व उपचार, आवश्यक संदर्भ सेवा तसेच गावपातळीवरील आरोग्य उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबतही प्रशिक्षणार्थींना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तांत्रिक सत्रे, गटचर्चा आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण अधिक परिणामकारक करण्यात आले.

या प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज चिंचोले, आरोग्य सहाय्यक गजेंद्र चौथनकर, सुनील लोखंडे, आरोग्य सहाय्यिका सुजाता अहिरे यांच्यासह जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, एएनएम, एमपीडब्ल्यू, गटप्रवर्तक, आशा समन्वयक तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक व पुनर्वसनात्मक आरोग्य सेवांना बळकटी देत प्रत्येक कुटुंबापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचविण्यावर आरोग्य विभागाचा भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

जोखीमग्रस्त तालखेड गावात २१३ नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात

शिवनी येथे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी;३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी; समुपदेशनासह मोफत औषधोपचार

🦟🚨 राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती मोहिम📉 डेंग्यू रुग्णसंख्येत घट; नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात – डॉ. सुजिता वाडीवे

जिल्हा आयुष रुग्णालयात वृक्षारोपण उत्साहातऔषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड ; वृक्षसंवर्धनाचा संदेश..

गोटपॉक्स लसीकरण : पहिल्या टप्प्यात ३७.५२ लाख लसमात्रांचे वाटप सुरू मोहीम गतिमान करण्याचे आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील