vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला-सांस्कृतिक कार्य विभागाची सांगीतिक मानवंदना प्रख्यात संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला हा सांगीतिक कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे 

संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला-सांस्कृतिक कार्य विभागाची सांगीतिक मानवंदना प्रख्यात संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला हा सांगीतिक कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे

राज्य प्रतिनिधी-नांदेड,  : ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला हा सांगीतिक कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे संपन्न होणार आहे.

 संगीतकार दशरथ पुजारी हे मागच्या पिढीमधील नामवंत संगीतकार आहेत .त्यांची सांगीतिक कारकिर्द खूप मोठी आहे . केशवा माधवा , देव माझा विठू सावळा , या लाडक्या मुलानो,झिमझिम झरती श्रावण धारा ,अजून त्या झुडुपांच्या मागे अशी अनेक गाणी रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य करत आहेत. त्यांच्या संगीतातील भक्तीविचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे त्याच बरोबर भावसंगीत ही त्यांनी एका उंचीवर नेवून ठेवले आहे .त्यांच्या सांगीतिक कार्याचा आढावा आणि गाणी असा कार्यक्रम आयोजित केला आहे

या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना संगीतकार आनंदीविकास यांची असून सागर जाधव ,शेफाली कुलकर्णी ,वर्षा जोशी हे गायक कलावंत सहभागी असणार आहेत . विकास देशमुख , विवेक कयाळ,विश्वेश्वर कोलंबीकर,पंकज शिरभाते , भगवानराव देशमुख , श्रीनिवास लंकावाड,शेख नईम ,शेख इस्माईल हे वादक कलावंत सहभागी आहेत तर संवादक म्हणून पद्माकर कुलकर्णी असणार आहेत . आजच्या पिढीसाठी जुन्या संगीताचा प्रेरणादायी ठरणारा हा कार्यक्रम आहे

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. ॲड. आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेनांदेड व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संगीत ,साहित्यासह सर्वच रसिकांनी या विशेष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मैफिल लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

श्रीगणेश राज्य महोत्सवांतर्गत 22 सप्टेंबरला नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सलील कुलकर्णी यांचा ‘हे गजवदन..’

vishwatmaklokswamivarta

१९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (MIFF) खुल्या चर्चासत्रात चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जबाबदार वापरावर भर देण्यात आला.

३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी ठाण्यात गोपीकृष्ण संगीत महोत्सव 

vishwatmaklokswamivarta

नाना पाटेकर : भूमिका अनेक, माणूस एक,पडद्यावर अनेक चेहरे; प्रत्येक चेहऱ्यामागे माणसाला समजून घेण्याचा एक वेगळा धडा…

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट महामंडळानं मुंबईत ब्रिक्स वेव्हज बाजारचं केलं आयोजन.

६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगकर्मींचा होणार सन्मान३० जून रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे हौशी मराठी नाट्य, बालनाट्य व प्रथम मराठी एकांकिका स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांचा गौरव